वरळीमधून तुमच्याविरूद्ध अमित ठाकरे लढले तर..? आदित्य ठाकरे यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कुठून निवडणुक लढणार सांगितलं आहे. टीव्ही9 मराठीच्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या कार्यक्रमामध्ये, मनसेकडून अमित ठाकरे यांना विरोधात उमेजदवारी दिली तर असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यंदा वरळीमधूनही ते आपला उमेदवार देणार आहेत, असं आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. यावर बोलताना, अनेक उमेदवार उतरतात. 15 ते 20 उमेदवार निवडणूक लढवतात. अनेक लोक येत असतात. पंतप्रधान मोदींना तीनदा कमी मते मिळाली. आमच्या उमेदवारांना असं काही घडत नाही. पाच वर्ष सातत्याने काम करणारे पक्ष असतात. काही पक्ष निवडणुकीला उठतात. मी मनसेवर टीका करणार नाही. मी वरळीतूनच लढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर जर राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना वरळीमधून उमेदवारी देण्याबाबत विचारण्यात आलं.
जरतर वर बोलण्यात अर्थ नाही. वरळी माझा मतदारसंघ आहे. सरकारमध्ये असताना मी कधीच कोणत्याही मतदारसंघावर अन्याय केला नाही. गुंतवणूकदारांना सांगायचो महाराष्ट्र आमचा आहे. प्रत्येक जिल्हा आमचा आहे, सर्वांना रोजगार द्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी सांगितला मविआमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
त्यांच्यातून चेहरा कोण,. ते जिंकत नाहीत. हाच चेहरा घेऊन ते जाणार आहेत का. त्यांचं सरकार आहे. त्यांनी सांगावं. आम्ही आमची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक त्यांना पालक म्हणून पाहत आहे. पण महायुतीकडे चेहरा कोण आहे. जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारत आहे असल्याचं म्हणतात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांवर निशाणा साधला.