Aarey Metro : आरे वृक्षतोड प्रकरणावर आज सुनावणी, पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात सादर केले पुरावे
आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. एमएमआरसीएलच्या वतीने एसजी तुषार मेहता यांनी आरेमध्ये आतापर्यंत एकही झाड तोडले नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे.
मुंबई – जेव्हापासून आरेमध्ये मेट्रोचं (Aarey Metro) काम सुरु झालं आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) वाद सुरु झाला आहे. दोन पक्षांमधला वाद आता कोर्टात गेला आहे. तसेच अनेक पर्यावरण प्रेमी देखील या वादात उतरले आहेत. त्यांनी देखील तिथल्या प्रकल्पाला विरोध केला आहे. आज झाडांच्या कत्तलीबाबतच्या याचिकांवर सर्वोच्छ न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे याचिकाकर्त्यांनी आरे कारशेड कामामुळे होणारी वृक्षतोड तातडीने थांबवावी, तसेच कारशेडच्या कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेत केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज नेमकं सुनावणीत काय याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
आरेमध्ये पुन्हा एकदा झाडे तोडण्याचे काम सुरू झाल्याचा युक्तिवाद
मुंबईतील आरे येथे उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेड प्रकल्पावरून वाद वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मध्यावधीत रखडलेल्या या प्रकल्पात सत्ताबदल झाल्यानंतरही अडथळे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. याच भागात आता काही याचिकाकर्त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आरेमध्ये पुन्हा एकदा झाडे तोडण्याचे काम सुरू झाल्याचा युक्तिवाद केला जात आहे. याला मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने विरोध केला जात असून, झाडे तोडण्यास बंदी घालण्यात आलेल्या न्यायालयाच्या 2019 च्या आदेशाचे हे उल्लंघन असल्याचे स्पष्टपणे सांगितले जात आहे.
एकही झाड तोडले नसल्याचे एमएमआरसीएलचे उत्तर
आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. एमएमआरसीएलच्या वतीने एसजी तुषार मेहता यांनी आरेमध्ये आतापर्यंत एकही झाड तोडले नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे. 2019 मध्ये बंदी घातल्यापासून, अशी कोणतीही प्रक्रिया पुढे नेण्यात आलेली नाही. तुषार मेहता सांगतात की फक्त काही झुडपे, गवत कापले आहे. काही पानेही तोडली आहेत, पण एकही झाड पूर्णपणे तोडलेले नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मेट्रो कारशेड प्रकल्पाचे काम आरे येथे हलविण्यात आले.