Abdul Sattar : 42 वर्षाच्या राजकारणात सात मुख्यमंत्री पाहिले, पण..; एकनाथ शिंदेंच्या सत्कार समारंभाप्रसंगी काय म्हणाले अब्दुल सत्तार?
शिवसेनेमध्येही इमानदार, वचनबद्ध लोक आहेत. वचनाच्या माध्यमातून चालणारे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या आणि गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणारे, न्याय देणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सलग 20 तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत. 42 वर्षांच्या राजकरणात 7 मुख्यमंत्री पाहिले पण शब्दपूर्ती करणारे हेच… रात्री 2 वाजेपर्यंत आमच्यासाठी काम करताना शिंदे साहेबांना पाहिले आहे, अशी स्तुतीसुमने अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर उधळली आहेत. मुंबईत आज अब्दुल सत्तार यांच्यातर्फे शिंदेंचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शिंदेंविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की मी राजकारणाचा (Politics) 40 वर्षांचा साक्षी आहे. अशोक चव्हाण यांच्यापेक्षा शिंदे 10 पटीने काम करणारे आहेत. 1 हजार कोटी रुपयांच्या योजना आपल्या मतदारसंघात मंजूर झाल्या. जे काम 2 वर्षात पूर्ण झाले नाही ते मुख्यमंत्री यांनी करून दिले. सूतगिरणीची मागणी 1980पासून होती. इतक्या वर्षात मंजूर नाही झाली, ती 80 तासात मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केली, असे सत्तार यावेळी म्हणाले.
‘आपली शिवसेना ओरिजिनल’
आपली शिवसेना ओरिजिनल आहे. धनुष्यबाण वाली आहे. कोणताही बाण समोर आला, तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या बाणासमोर टिकूच शकत नाही, असे सत्तार म्हणाले. मला शिवसेना माहीत नव्हती. अडीच वर्षांपूर्वी मी शिवसेनेत आलो. शिवसेनेमध्येही इमानदार, वचनबद्ध लोक आहेत. वचनाच्या माध्यमातून चालणारे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या आणि गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणारे, न्याय देणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. मी काही स्तुती करत नाही, जे खरे आहे तेच बोलतो, असे सत्तार म्हणाले.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
‘रात्री दोन वाजताही केले काम’
विधानसभेत जेव्हा तुम्ही तासभर बोलत होतात, त्यावेळेला लाखो लोक रडत होते. शंभर आमदार तर मी रडताना पाहिले. आमच्या सभागृहात रडताना पाहिले. आपल्या परिवाराचा प्रमुख बोलतो आहे, असा विचार करून सभागृहात शांतता होती. ज्या वेळी शिंदे साहेबांकडे गेलो, त्या प्रत्येकवेळी काम झाले. एकदा तर एक काम थोडे राहिले होते. सेक्रेटरी म्हणाले, हे मुख्यमंत्र्यांकडून लिहून आणावे लागेल. त्यावेळी दोन वाजले होते. मात्र तरीदेखील त्यांनी आपले काम केले, असे अब्दुल सत्तार म्हणाले.