मुंबई विमानतळावर गुप्तचर अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ
मुंबई विमानतळावर एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक बाबू (Abhishek Babu suicide Mumbai Airport )असं या अधिकाऱ्याचे नाव आहे.
मुंबई : मुंबई विमानतळावर एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक बाबू (Intelligence Officer suicide at Mumbai airport ) असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते विमानतळावरील इमिग्रेशन विभागात ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अर्थात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत होते. (Intelligence Officer suicide at Mumbai airport )
अभिषेक बाबू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील P4 भागातील पार्किंगच्या इमारतीवरुन उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या अभिषेक बाबू यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र अभिषेक बाबू यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.
Mumbai Police: Abhishek Babu, Junior Intelligence Officer posted at Bureau of Immigration, has committed suicide at P4 area of Chhatrapati Shivaji Maharaj International Airport; more details awaited pic.twitter.com/dPOgnGcY3r
— ANI (@ANI) January 13, 2020
अभिषेक बाबू यांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. पार्किंगमधून उडी मारल्यानंतर, नेमकं काय घडलंय हे काहीवेळासाठी कोणालाच कळलं नाही. थोड्याच वेळानंतर कोणीतरी इमारतीवरुन उडी मारल्याचं समोर आलं. पण त्यांची ओळख पटली नव्हती. अधिक चौकशीनंतर उडी मारणारी व्यक्ती हा ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अभिषेक बाबू असल्याचं स्पष्ट झालं.