Video : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण, आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर
ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने दहिसर परिसर हादरला होता. या घटनेचा पोलीस तपास सुरू असताना एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ज्यामध्ये मेहुल नावाचा व्यक्ती मॉरिस याच्या ऑफिसमधून बाहेर जातान दिसत आहे. पाहा सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय आहे?
मुंबई : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्याच भागातील मॉरिस भाई याने आपल्या ऑफिसमध्ये बोलावत फेसबुक लाईव्ह करत गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात सुरूवातीला कोणतेही सीसीटीव्ही फुटेज समोर आलं नव्हतं. फक्त मॉरिसने घोसाळकरांना मारलेल्या गोळ्या मारतानाचं फेसबुक लाईव्ह होतं. अशाताच आता या प्रकरणात मॉरिस याच्या ऑफिसबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मॉरिस याचा मित्र मेहुल याला संशयित म्हणून पाहिलं जातं होतं. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये ऑफिसमध्ये होते. त्यादरम्यान मेहुल हा आतमध्ये येऊन गेला होती. गोळीबार होण्याआधी तो तिथून बाहेर पडला आणि रिक्षाजवळ गेला. तिथून परत एकदा पान टपरीजवळ गेला आणि त्यानंतर रिक्षात बसून निघून गेल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:-
सीसीटीव्ही फुटेज पाहून काही सवाल उपस्थित होत आहेत ते म्हणजे मेहुलसोबत रिक्षामध्ये असलेले दोघे कोण आहेत? मेहुल याला गोळीबाराबाबत काही माहिती होती का? असा सवाल उपस्थित होत आहेत. पोलीस आता या प्रकरणाची गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरूवात होत आहे.
मॉरिसने असा रचला डाव
दरम्यान, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फोन करत साडी वाटपाच्या कार्यक्रमाला येऊन जा असं सांगितलं. पाच मिनिटाचं फेसबुक लाईव्ह करत आता एकत्र येऊन काम करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर संधी साधत त्याने घोसाळकर यांचं लाईव्ह संपत असताना घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. जीव वाचवण्यासाठी ते तिथून बाहेर पडले होते. करूण रूग्णालयात त्यांना नेण्यात आलंं होतं. मात्र घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता. आता तपासात काय समोर येत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.