…तर प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करुन काय साधणार?, अबू आझमींचे उद्धव ठाकरेंना पत्र

आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 14 दिवसांच्या सशुल्क क्वारंटाईन बद्दल पत्र लिहिले आहे. Abu Azami Uddhav Thackeray

...तर प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करुन काय साधणार?, अबू आझमींचे उद्धव ठाकरेंना पत्र
आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलय
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 11:41 AM

मुंबई: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 14 दिवसांच्या  सशुल्क क्वारंटाईन बद्दल पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सरकारनं यूरोप आणि मध्य पूर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांना पेड क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पूनर्विचार करण्याची मागणी अबू आझमी यांनी केली आहे.  (Abu Azami wrote letter to Uddhav Thackeray on compulsory paid quarantine)

परदेशातून मुंबईच्या विमानतळांवर आल्यास पेड क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यामुळे लोक देशातील दिल्ली, बेंगलोर, कोलकत्ता येथे विमानावरुन येऊन रेल्वे किंवा देशांतर्गत विमानसेवेद्वारे महाराष्ट्रात येतील. त्यांना क्वारंटाईटन कसं करणार हा प्रश्न अबू आझमींनी उपस्थित केला. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी कोरोना रोखण्यासाठी हा मार्ग नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

आखाती देशात काम करणाऱ्या मजुरांवर अन्याय

आखाती देशात काम करणारे मजूर सुट्टीसाठी आपल्या देशात परत येणार आहेत. तिथे मजूर एक एक पैसा साठवून भारतात कुटुंबाला पैसे पाठवत असतात. त्यांना भारतात परत आल्यास त्यांना स्वत:च्या पैशानं क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यामुळे ते मुंबईला थेट न येता अहमदाबाद, बंगळुरु किंवा दुसऱ्या विमानतळावर येतील. तिथून ते मुंबई किंवा त्यांच्या शरात जातील. यामुळे त्यांचे जादा पैसे खर्च होतील. पेड क्वारंटाईन करण्याचा निर्णय त्या मजुरांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारनं पेड क्वारंटाईनचा निर्णय मागं घ्यावा, अशी विनंती अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात मध्यपूर्वेतून येणारे नागरिक 14 दिवस क्वारंटाईन

संपूर्ण यूरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

(Abu Azami wrote letter to Uddhav Thackeray on compulsory paid quarantine)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.