AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : एबीव्हीपीचा तळागाळातला कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; वाचा, गिरीश महाजनांची राजकीय कारकीर्द

गिरीश महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला झाली. तेव्हा ते महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजपाची युवा शाखा) तालुकाध्यक्ष बनले.

Girish Mahajan : एबीव्हीपीचा तळागाळातला कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; वाचा, गिरीश महाजनांची राजकीय कारकीर्द
गिरीश महाजनImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 09, 2022 | 1:39 PM
Share

मुंबई : संकटमोचक अशी ओळख असलेल्या भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील राजकारणी आहेत. ते जामनेरचे विद्यमान आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस (Girish Mahajan) यांच्या मंत्रिमंडळात (2014-19) ते जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री होते. गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे 14व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. तर सलग सहाव्यांदा काम करत आहेत. महाजन यांचा जन्म जामनेर येथे झाला. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून महाजन 1978मध्ये एबीव्हीपीचे सक्रिय सदस्य होते. एबीव्हीपीमध्ये (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) त्यांनी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. तिथे त्यांनी भिंती रंगवल्या आणि राजकारण्यांसाठी प्रचारात्मक पोस्टर वाटले. त्यांची अभाविपच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला राजकारण

महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला झाली. तेव्हा ते महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजपाची युवा शाखा) तालुकाध्यक्ष बनले. 1992मध्ये जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाजन निवडून आले. 1995मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 2014पर्यंत त्यांनी आमदार म्हणून 5वी टर्म काम करत कार्यकाळ पूर्ण केला. महाजन यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सरकारने 12 नोव्हेंबर 2014 रोजी तोंडी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

शपथ घेताना गिरीश महाजन

गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता त्यांना स्थान देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी एकनाथ खडसे यांच्यासोबतचा त्यांचा वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अंतर्गत राजकारणाला कंटाळून एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या सोबत गेले. आता जळगावातील या दोन नेत्यांत आरोप-प्रत्यारोपांचा सामना नेहमीच सुरू असतो. अलिकडेच राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर खडसे निवडून गेले. त्यानंतर काही काळातच राज्यातले महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतरही या दोन नेत्यांमधील वाद आणि मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता गिरीश महाजन यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यावर एकनाथ खडसेंची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.