Breaking : मुंबई AC Localच्या तिकीट दरात 50% कपात! मुंबईकरांचा गारेगार प्रवास अखेर आवाक्यात, नवे दर असे असणार?

Mumbai AC Local Rates : मुंबईतील एसी लोकलच्या तिकिटाचे दर हे 50 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Breaking : मुंबई AC Localच्या तिकीट दरात 50% कपात! मुंबईकरांचा गारेगार प्रवास अखेर आवाक्यात, नवे दर असे असणार?
एसी लोकलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 2:42 PM

नागपूर : मुंबईतील एसी लोकलच्या (Mumbai AC Local) तिकिटाचे दर हे 50 टक्क्यांनी कपात (Mumbai AC local Ticket rate) करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी केंद्राचे आभारही मानले आहे. ते नागपुरात बोलत होते. एकीकडे राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) आहे. मुंबईचं तापमान चाळीसच्या आसपास पोहोचल्याचं बघायला मिळतंय. मात्र अशातही मुंबईतल्या एसी लोकलला मात्र मिळणारा प्रतिसाह हा अतिशय थंड होता. अव्वाच्या सव्वा तिकीट दर असल्यानं मुंबईकरांनी एसी लोकलला पाठच दाखवली होती. मात्र अखेर आता प्रवासी एसी लोकलच्या प्रवासाला पसंती देतील, असा विश्वास व्यक्त केला जातो. तिकिटाच्या दरात पन्नास टक्के कपात करण्यात आल्यानं मुंबईकरांना लोकलप्रवास खऱ्या अर्थानं गारेगार ठरणार आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलच्या (AC Local) दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर ही कपात सत्यात उतरली असल्याची माहिती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या निर्णयाबाबत त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभारले आहेत.

20+30 = 50%

गेल्या काही दिवसांपासून एसी लोकल प्रवासाच्या तिकीट दरांबाबत दिलासादायक निर्णय येईल, याची कल्पना मुंबईकरांना होती. मात्र ही कपात फार फार तर वीस किंवा तीस टक्के होईल, असं बोललं जातं होतं. त्याबाबतचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलेला.

अखेर वीस अधिक तीस अशी गोळाबेरीत करत थेट पन्नास टक्केच कपात एसी लोकलच्या तिकीट दरांमध्ये करण्यात आल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता तिकीट दरांतील कपातीनंतर मुंबईतील प्रवाशी एसी लोकलला पसंती देतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.

गारेगार लाईफलाईन

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून लोकलची ओळख आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने काही एसी लोकल देखील चालवण्यात येतात. मात्र या लोकलचे तिकीट दर सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने म्हणावा असा प्रतिसाद मिळत नव्हता.. प्रवाशी संख्या वाढावी यासाठी तिकीट दर कपातीचा निर्णय घेतला अखेर घेतला गेलाय.

फडणवीसांनी दिली मुंबईकरांसाठी खूशखबर

असे असू शकतील एसी लोकलचे स्वस्त झालेले दर :

  1. विरार- चर्चगेट – पश्चिम रेल्वे आधीची एसीचे दर 220 रु (महिना पास – 2200) आताचे एसीचं संभावित दर110 रु (महिना पास – 1100)
  2. बोरिवली- चर्चगेट – पश्चिम रेल्वे आधीची एसीचे दर 180 रु (महिना पास – 1800) आताचे एसीचं संभावित दर90 रु ( महिना पास – 900)
  3. कल्याण- सीएसएमटी – मध्य रेल्वे आधीची एसीचे दर 210 रु ( महिना पास 2100) आताचे एसीचं संभावित दर105 रु (महिना पास 1050)
  4. अंबरनाथ- सीएसएमटी – मध्य रेल्वे आधीची एसीचे दर 220 रु (महिना पास 2200) आताचे एसीचं संभावित दर110 रु (महिना पास 1100)
  5. टिटवाळा- सीएसएमटी – मध्य रेल्वे आधीची एसीचे दर 220 रु (महिना पास 2200) आताचे एसीचं संभावित दर110 रु (महिना पास 1100)
  6. कसारा- सीएसएमटी – मध्य रेल्वे आधीची एसीचे दर 315 रु (महिना पास 3150) आताचे एसीचं संभावित दर158 रु (महिना पास 1580)
  7. पनवेल- सीएसएमटी – हार्बर रेल्वे आधीची एसीचे दर 210 रु ( महिना पास 2100) आताचे एसीचं संभावित दर 105 रु (महिना पास 1050)
  8. ठाणे- पनवेल – हार्बर रेल्वे आधीची एसीचे दर 185 रु (महिना पास 1850) आताचे एसीचं संभावित दर 93 रु (महिना पास 930)

पाहा व्हिडीओ – नेमकं काय म्हणाले फडणवीस?

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.