अपघातवार | कराड, माळशेज घाट, पाटणमध्ये अपघात, चौघांचा मृत्यू

रविवार हा अपघातवार ठरला आहे.राज्यात तीन ठिकाणी भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहे.

अपघातवार | कराड, माळशेज घाट, पाटणमध्ये अपघात, चौघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 12:24 AM

मुंबई : रविवार हा अपघातवार ठरला आहे.राज्यात तीन ठिकाणी भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहे. पुण्याहून कोल्हापूरला कुस्ती परिषदेसाठी गेलेल्या पैलवानांच्या गाडीला परत जाताना कराडजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत तर तिघे जखमी आहेत. मृत्यू पावलेले आणि जखमी झालेले पैलवान हे पुण्यातील कात्रजच्या गोकुळ वस्ताद तालमीचे असल्याची माहिती मिळतेय. पुणे-बंगळुरु महामार्गावर कराडजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं कळतंय. जखमींवर सध्या कराडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहे.(Accident in Karad, Malshej Ghat, Patan, death of four)

राहुल दोरगे (वय 28), स्वप्निल शिंदे (वय 28), रविराज साळुंखे (सर्व रा. कात्रज, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कार रस्त्यालगतच्या नाल्यातून जात बाजूच्या झाडावर आदळल्या. पघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. तसेच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी त्वरीत कराड येथील सह्याद्री रुग्णालयात पाठविले.

माळशेज घाटात बसला अपघात

दुसरीकडे माळशेज घाटात आंब्याच्या वळणावर खासगी बसला भीषण अपक्षात झाला. या बसमध्ये एकूण 16 प्रवासी होते. त्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त खासगी मिनी बस अष्टविनायकाचं दर्शन करुन उल्हासनगरला जात होती. चालकाला वेगाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. घाटात आणि अंधारात हा अपघात झाल्यानं जखमींना मदत मिळण्यास काहीसा उशीर झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातातील काही जखमींना आळेफाटा इथल्या माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जखमींना उपचारासाठी कल्याणला हलवल्याची माहिती मिळतेय.

पाटणमध्येही एसटीला अपघात

पाटण तालुक्यातील सडावाघापूर इथं वनकुसवडे पठारावार एसटी बसला अपघात झालाय. या अपघातात 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. त्यात एसटी चालक आणि वाहकाचाही समावेश आहे. पाटणकडे जाणाऱ्या एसटी बसचं चाक निखळून पडल्यानं ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

Pune Accident | सोमवार की अपघातवार; पुण्यात एकापाठोपाठ चार अपघात

पोलादपूर अपघातातील 3 मृत आणि 43 जखमींची नावं Tv9 कडे; संपूर्ण यादी

Accident in Karad, Malshej Ghat, Patan, death of four

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.