आरे कॉलनीतील आग नियंत्रणात,100 जवानांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीत लागलेली आग आटोक्यात आली आहे. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले. आरे कॉलनीच्या इन्फीनिटी आयटी पार्कजवळील जंगलात ही आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास 100 जवानांनी प्रयत्न केले, त्यानंतर ही आग आटोक्यात आली, यासाठी 20 बंब […]
मुंबई : गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीत लागलेली आग आटोक्यात आली आहे. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले. आरे कॉलनीच्या इन्फीनिटी आयटी पार्कजवळील जंगलात ही आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास 100 जवानांनी प्रयत्न केले, त्यानंतर ही आग आटोक्यात आली, यासाठी 20 बंब आणि 7 टँकर लागले. सोमवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही आग भडकली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरु लागली, बघता बघता आगीने रुद्र रुप धारण केले. सुके गवत असल्याने ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीची तिव्रता लक्षात घेत स्थानिकांना आणि पाळीव जनावरांना लगेच सुरक्षित ठिकाणी हलवले. या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर वन्य जीवांचेही हाल झाले आहेत. आग लागलेलं ठिकाण हे वनखातं आणि फिल्मसीटीच्या अख्यारित येते. ही आग लागली की लावली गेली याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.