मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात महापालिका सख्त ! 21 दिवसांत 82 हजार जणांवर कारवाई

मुंबई महापालिकेने 1 ते 21 ऑक्टोबरदरम्यान मास्क न वापरणाऱ्या 82 हजार 497 नागरिकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 64 लाखांचा दंड वसूल केला आहे. (BMC action against the citizens who dont wear mask)

मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात महापालिका सख्त ! 21 दिवसांत 82 हजार जणांवर कारवाई
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 9:06 PM

मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क लावणं अनिवार्य आहे. मात्र, तरीही नियमांचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे. याविरोधात मुंबई महापालिकेने कंबर कसली असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणं आणखी तीव्र केलं आहे. महापालिकेने 1 ते 21 ऑक्टोबरदरम्यान तब्बल 82 हजार 497 नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत महापालिकेने प्रत्येकी 200 प्रमाणे एकूण 1 कोटी 64 लाखांचा दंड नागरिकांकडून वसूल केलाय .(action of Mumbai Municipal Corporation against the citizens who do not wear masks)

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर 200 रुपयांचा दंड आकारण्याचेही निर्देश राज्यसरकारने दिले आहेत. टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर मर्यादित होता. पण टाळेबंदी संपल्यानंतर गर्दीचे प्रमाण वाढले. ही परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून सुरक्षित अंतर राखण्यासह मास्कच्या वापरासाठी जनजागृती केली जात आहे. असे असले तरी मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कारवाई आणखी तीव्र केली आहे.

महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार कारवाई वेगवान केली आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी मास्क वापरावा, हा कारवाईमागील उद्देश आहे.

कधी आणि कशी कारवाई केली

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून ही कारवाई केली जात आहे.  9 एप्रिल ते 21 ऑक्टोबर 2020 दरम्यान एकूण 1 लाख 752  नागरिकांकडून 2 कोटी 30 लाख 29 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला. 1 ते 21 ऑक्टोबर 2020 या 21 दिवसांत एकूण 82 हजार 497 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येक नागरिकाकडून 200 रुपये प्रमाणे एकूण 1 कोटी 64 लाख 96 हजार 900 इतकी रक्कम दंड स्वरुपात वसूल करण्यात आली. 21 दिवसांत कारवाई केलेल्या नागरिकांची संख्या ही एकूण कारवाईच्या 82 टक्के आहे. तर, दंडापोटी मागील 21 दिवसांत वसूल केलेली रक्कम ही आतापर्यंतच्या एकूण रकमेच्या सुमारे 72 टक्के इतकी आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून मास्क आणि सॅनिटायझर देऊन जनजागृती

Corona Update | मुंबईत 60% कोरोना मृत्यू झोपडपट्ट्यातील तर मुंबई कोरोना रुग्णांना बेड मिळना

Mumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

(action of Mumbai Municipal Corporation against the citizens who do not wear masks)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.