ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर आज अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवलं जाणार पार्थिव

Ramesh Deo : बुधवारी सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानं संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असल्याचं अजिंक्य देव यांनी म्हटलंय. सकाळी 10.30 वाजता अंधेरीतील (Andheri) घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर आज अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवलं जाणार पार्थिव
रमेश देव यांच्यावर आज अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 1:01 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास (Veteran actor Ramesh Deo is no More) घेतला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रमेश देव यांचे सुपुत्र अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. बुधवारी सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानं संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असल्याचं अजिंक्य देव यांनी म्हटलंय. सकाळी 10.30 वाजता अंधेरीतील (Andheri) घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशानं त्यांच्यावर प्रेम होतं. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, अशी प्रार्थना सगळ्यांनी करावी, असं आवाहन अजिंक्य देव (Ajinkiya De0) यांनी केलंय.

आज अंत्यसंस्कार!

अजिंक्य देव यांनी म्हटलंय की, आज सकाळी 10.30 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जुहूतील रुपरंग सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानीच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अजिंक्य देव यांनी दिली आहे. त्यानंतर पारसीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनामुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे.

100 वर्ष जगायची इच्छा

सयाजी शिंदे यांच्यासोबत बोलताना रमेश देव यांनी आपली शंभर वर्ष जगायची इच्छा आहे, असं म्हटलं होतं. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना त्यांनी रमेश देव यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. दरम्यान, अशोक सराफ यांनीही रमेश देव यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला असल्याचं म्हटलंय. दोन दिवसांपूर्वीच आपण रमेश देव यांच्यासोबत फोनवर बोललो होतो, असं अशोक सराफ यांनी म्हटलंय.

30 जानेवारीला रमेश देव यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता. दरम्यान, त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण देव कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्यासह दिग्गजांनी रमेश देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या :

Ramesh Deo : ठाकूरांचा ‘देव’ होण्यापासून ते पहिल्या चित्रपटापर्यंत! कसा होता रमेश देव यांचा प्रवास?

Ramesh Deo Death : अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी बहरली?

रमेश देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा, तब्बल 475 सिनेमात साकरल्या भूमिका

पाहा व्हिडीओ –

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.