मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच, सोनू सूदची सर्वोच्च न्यायालयात धाव

भिनेता सोनू सूदने आपल्या संपत्तीवर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच, सोनू सूदची सर्वोच्च न्यायालयात धाव
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 2:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आपल्या संपत्तीवर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सोनूने आपल्या एसएलपीमध्ये म्हटलंय की, ना ही आपण सवयीचा गुलाम आहे आणि नाही ही कायदा किंवा नियमांबाहेर काही बदल केला आहे. आपण हॉटेलच्या अंतर्गत बाबींमध्ये बदल केला आहे. आणि महापालिकेच्या म्हणण्यानुसार अंतर्गत बदलाला कुठल्या मंजुरीची गरज नाही. तरीही 2018 मध्ये परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, बीएमसीकडून अद्याप त्या अर्जावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, असं सोनू सूद यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.(Actor sonu sood challanged bombay highcourt order in BMC case)

यापूर्वी अवैध बांधकाम प्रकरणात सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका मिळाला आहे. न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं सोनू सूद यांनी याचिका फेटाळून लावली होती. सोनू सूद यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील इमारतीच्या बांधकामात नियमांचं उल्लंघन होत असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं. त्यावर मुंबई महापालिकेकडून रहिवासी इमारतीचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसशी संबंधित शर्थींचं पालन करण्यासाठी सोनू सूदच्या वकिलांनी न्यायालयाकडे 10 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने कायदा हा मेहनती लोकांनाच मदत करतो, असं सांगत याचिका फेटाळून लावली होती.

मुंबई महापालिकेकडे जाण्याचा सल्ला

सोनू सूद यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की, मुंबई महापालिकेला कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यापासून रोखलं जावं. त्याचबरोबर महापालिकेनं पाठवलेल्या नोटीसमधील अटीशर्थींचं पालन करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात यावी. यावर उच्च न्यायालयाने सोनू सूदला मुंबई महापालिकेकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालय कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली आहे. सहा मजली इमारत परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याची पालिकेची तक्रार आहे. सोनू सूदला याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केलीय.

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता रुपातंर केल्यामुळे पालिकेने पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे.

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर; BMC ची पोलिसांकडे तक्रार

Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

Actor sonu sood challanged bombay highcourt order in BMC case

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.