ठाणे : ‘चितळे बंधू’ आणि पुणे यांचं अनोखं नातं आहे. पुणे-मुंबईनंतर आता ‘चितळे बंधू‘ ठाण्यात ठाण मांडत आहेत. नौपाडा परिसरातील गोखले रोड भागात सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या हस्ते ‘चितळे बंधू’च्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. (Actress Mukta Barve inaugurates Chitale Bandhu Shop in Thane)
ठाणेकरांना आता ‘चितळें’ची बाकरवडी, श्रीखंड, लोणी, तूप चाखायला मिळणार आहे. चितळे बंधूंची उत्पादने आतापर्यंत देश-विदेशाता विविध ठिकाणी पोहचली होती. मात्र ठाण्यात चितळेंचे दुकान उघडल्यामुळे ठाणेकर खुश आहेत.
“चितळेंची मिठाई म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. पाडव्याला किंवा इतर सणांना चितळेंची मिठाई एकमेकांना देणे हा एक उत्सव असल्यासारखं वाटतं. ही संस्कृती आता ठाणेकरांना अनुभवायला मिळणार असल्याने याचा मोठा आनंद आहे” अशा भावना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केल्या. यावेळी चितळे बंधू उद्योग समूह ची टीम देखील उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे पूर्ण सिस्टीम हलली असली तरी जिथे डाऊनफॉल असतो तिथे वर जाण्याचा मार्ग देखील असतो. अशा प्रकारच्या फ्रांचायजी सुरु होणे ही उद्योगधंद्यासाठी सकारात्मक चित्र असल्याचंही मुक्ता म्हणाली.
विविध स्वरुपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी चितळे यांच्या पुण्यातील दुकानात सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. शॉपच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांनी मिठाई घेण्यासाठी गर्दी केली होती. चितळेंची प्रसिद्ध असलेली बाकरवाडी यापूर्वीही ठाण्यात मिळत असली तरी आता सर्वच मिठाई एकाच छताखाली मिळणार असल्याचे मुक्ता बर्वेने सांगितले.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 3 November 2020 | 3 PMhttps://t.co/ZCJApYCWYA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2020
संबंधित बातम्या :
बाकरवडी-श्रीखंडाची चव पुन्हा जिभेवर, लॉकडाऊनमध्येच ‘चितळे बंधू’ पुणेकरांच्या सेवेत
(Actress Mukta Barve inaugurates Chitale Bandhu Shop in Thane)