“हिम्मत असेल तर वरळीत…”,आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट आव्हान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात फूट दिसून आली आहे. माजी नगरसेवक संतोष खरात यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

हिम्मत असेल तर वरळीत...,आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट आव्हान
"हिम्मत असेल तर वरळीत...",आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट आव्हान
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 8:17 PM

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यापासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही पक्ष धनुष्यबाण या चिन्हावर दावा दाखल करत आहेत. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात फूट दिसून आली आहे. माजी नगरसेवक संतोष खरात यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. इतकंच काय तर हिम्मत असेल माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हान देखील दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, माझ्या विरोधात निवडणुकीला उभं राहा. जर त्यांनी सांगितलं तर मी माझ्या मतदारसंघातून राजीनामा देईल. त्यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणुकीला उभं राहा.”

“ते आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राचा वापर करत आहेत. यामुळेच मी रस्ते घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. मला असं वाटतं की मुंबईत हुकूमशाही सुरु आहे. एक वर्ष उलटून गेलं तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत. त्यांनी एक प्रशासक नियुक्त केला असून मुख्यमंत्री त्यांना आदेश देतात. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि निवडणूकही जिंकू.”, असंही आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितलं.

धनुष्यबाण चिन्हाचा वाद

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी दावा दाखल केला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून शिवसेना पक्षासह चिन्हाची मागणी केली जात आहे. सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात दोन्ही गटाकडून म्हणणं मांडले जात आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाच्या वकिलांनी आत्तापर्यंत केलेला युक्तिवाद बघता यामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हा गोठवलं गेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्टात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबतचा निर्णय देतांना निवडणूक आयोगाची मोठी कसोटी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी केलेला युक्तिवाद बघता धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबत स्पष्टता येत नाही. निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यन्त तारीख पे तारीख सुरू आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.