मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या इमारतींची कामांना गती द्या, पालकमंत्री आदित्य ठाकरेंचे आदेश

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या कामाचा आढावा घेतला.

मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या इमारतींची कामांना गती द्या, पालकमंत्री आदित्य ठाकरेंचे आदेश
Aditya Thackeray
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 2:24 AM

मुंबई : पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या कामाचा आढावा घेतला. ते स्वतः या कामांच्या आढावा बैठकीत उपस्थित होते. यावेळी त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या इमारतींच्या कामांना गतिमान करण्याचे आदेश दिले. पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामातील अडचणी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवाव्यात आणि हे काम गतिमान करावं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं (Aditya Thackeray comment on Police station work and Forest conservation).

उपनगरामध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाकोला, मेघवाडी, गोरेगाव आणि मालाड पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामाकरिता 37.95 कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आला आहे. यापैकी 8 कोटी रुपयांचा निधी राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांना वर्ग करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामातील अडचणी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवून हे काम गतिमान करण्यात यावं, अशा सूचना पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपनगरांमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून आणखी 5 पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारत बांधण्याबाबत पोलीस विभागाने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने चर्चा झाली. विनोबा भावे नगर (कुर्ला), बांगुरनगर (मालाड), चेंबुर, पंतनगर (घाटकोपर) आणि सागरी – 2 पोलीस ठाणे (एरंगळ, बोरीवली) या पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारत बांधकामाचा प्रस्तावामध्ये समावेश आहे.

या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर, अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कांदळवनाच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचला, आदित्य ठाकरेंच्या सूचना

“कांदळवनाची होणारी कत्तल रोखणे तसेच कांदळवनावर डेब्रीज टाकून त्याचे नुकसान करण्याच्या प्रकाराला तत्काळ आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत,” अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनांचे असलेले महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी प्रबोधन करण्याबरोबरच कांदळवनाच्या जागी संरक्षक भिंती किंवा कुंपण बांधणे, सीसीटीव्ही लावणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात. कांदळवनांवर डेब्रीज टाकणारी वाहने आणि संबंधीत विकासकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया करण्यात याव्यात, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

कांदळवनांवर डेब्रीज टाकणाऱ्या वाहनांवर कारवाई करा

कांदळवनांचे जतन आणि संवर्धनासाठी आदित्य ठाकरे हे वेळोवेळी बैठका घेऊन याचा आढावा घेत आहेत. मागील आठवड्यात कांदळवनांवर डेब्रीज टाकणाऱ्या काही वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला गती देण्यात यावी, संबंधित वाहने ताब्यात घेण्यात यावीत, तसेच फक्त वाहनचालकावर कारवाई न करता डेब्रीजचा स्त्रोत शोधून संबंधित बांधकाम विकासकावरही कारवाई करण्यात यावी, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

कांदळवनाचे नुकसान करणाऱ्या संबंधितांवर वन आणि पर्यावरण संवर्धनविषयक नियमांनुसार एफआयआर दाखल करण्यात यावेत. तसेच या प्रकरणांचा न्यायालयातही योग्य पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, पोलीस उपायुक्त चैतन्या एस. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा; आदित्य ठाकरेंची घोषणा

आदित्य ठाकरे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांच्या खात्याने करुन दाखवलं!

मुंबईत ज्या मियावाकी झाडांची जोरदार चर्चा आहे ती लावायची कशी, जोपासायची कशी? आदित्य ठाकरेंकडून पहाणी

व्हिडीओ पाहा :

Aditya Thackeray comment on Police station work and Forest conservation

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.