आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा

दांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 7:22 PM

मुंबईः वेदांता प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना आव्हान देत आपल्यासोबत वेदांतावरून डिबेट करा असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खोटं बोलत आहे असा आरोप भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वेदांता प्रकरणावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.

ठाकरेंवर टीका करताना आमदार आदित्य ठाकरे खोटं बोलतात अशी थेट टीका केली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आदित्य ठाकरे यांनी जर पुरावे दिले नाही तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विनाफेव्हिकॉलचं बंद होई असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित करावा आणि जर सरकारने जर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.

तर मात्र सरकारचं तोंड बंद होईल आणि उत्तर दिले गेले तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विना फेव्हिकॉल बंद होईल असंही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करताना त्यांनी ठाकरे गट आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारवर खोटेनाटे आरोप करत आहे असा आरोप केला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातच गेले नाहीत. त्यामुळे वेदांताविषयी चर्चा कोणाबरोबर करणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मागच्या सरकारच्या काळात वेदांता प्रकल्पासाठी कुठेही जागा मिळाली नाही, त्यांच्याबाबत कुठेही बैठका झाल्या नाहीत, वेदांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला आहे.

त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयात गेले नाहीत, त्यामुळे कोणाबरोबर बैठका घ्यायच्या हा प्रश्न होता. आदित्या ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा खोटारेडापणा आहे,

आपल्या काळात त्यांनी काय केले नाही म्हणून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी असे खोटेनाटे आरोप केले आहेत अशी टीका आता चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्याता आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.