VIDEO | आदित्य ठाकरेंनी आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्यावर धरला ठेका, गलका आणि जल्लोषाने आरे कॉलनी दुमदुमली

पाड्यांपर्यंत येणारे रस्ते चांगले होणार, मूळ गरजा पुरवल्या जाणार, जंगल जे तुमचं आहे, ते तसंच ठेवण्याची जबाबदारी मी उचलतोय असे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

VIDEO | आदित्य ठाकरेंनी आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्यावर धरला ठेका, गलका आणि जल्लोषाने आरे कॉलनी दुमदुमली
आदित्य ठाकरेंनी आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्यावर धरला ठेका
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 6:55 PM

मुंबई : मुंबईच्या आरेत आज जल्लोषात आदीवासी दिन साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोरेगावमधील आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यावर आज सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत तारपा नृत्य सादर केलं. (Aditya Thackeray danced Tarpa dance with tribal brothers)

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

यावेळी आदित्य ठाकरे यांनी 808 एकर जागा जंगल म्हणून घोषित करीत सर्व अधिकार अबाधीत ठेवले. पाड्यांवर लसीकरण पोहोचलं नव्हतं, लसीकरण सुरू करीत आतापर्यंत 3 हजार लोकांना लस दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दोन डोस सगळ्यांचं व्हायला हवं. प्रत्येकाला लस घेण्यासाठी लोकांचं सहकार्य गरजेचं असल्याचेही आदित्य यांनी नमूद केले. वातावरण बदलाचा सगळ्यांना फटका बसलाय. जंगलाशी असलेलं नातं तुटलंय, यात आमचीही चूक आहे. जगाला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पृथ्वीशी असलेलं नातं तुटतंय. हे नातं आदीवासी आहेत, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले. तसेच पाड्यांपर्यंत येणारे रस्ते चांगले होणार, मूळ गरजा पुरवल्या जाणार, जंगल जे तुमचं आहे, ते तसंच ठेवण्याची जबाबदारी मी उचलतोय असे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

रविंद्र वायकर यांनी पारंपरिक गौरी नृत्यावर धरला ठेका

येथील स्थानिक आदिवासी बांधवांनी पारंपारीक गौरीही नृत्य सादर केलं. स्वतः स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनीही या गौरी नृत्यावर ठेका धरला. इथल्या फोर्स वनच्या जागेवर असलेले आदिवासींच्या झोपड्यांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे फोर्सला फायरिंगचा सराव करता येत नाही. याबाबत सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी केली.

आदिवासी दिनानिमित्त पालघरमध्ये भव्य रॅली

जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषा परिधान करत हजारो आदिवासी बांधव, तरुण-तरुणींनी तारपा, धुमश्या अशा पारंपरिक वाद्यांवर तालावर ताल धरत या मिरवणुकीत सहभागी झाले. पालघर जिल्ह्यात औद्योगिक कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, एमएमआरडीए विस्तारीकरण, फ्रेंड कॉरिडॉर, औद्योगिक वसाहती इत्यादी प्रकल्प योजनांमुळे येथील आदिवासी भूमिपुत्र आपल्या जंगलापासून, आपल्या जमिनींपासून वेगाने वंचित होत आहेत. या सर्व विनाशकारी प्रकल्पाविरोधात आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी आपली एकजूट दाखवली. (Aditya Thackeray danced Tarpa dance with tribal brothers)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.