सुनते हैं तो दिल्ली का, यही दुःख है महाराष्ट्र का, आदित्य ठाकरे यांचा इशारा कुणाकडं?
एक सीएम आणि एक स्पेशल सीएम आहे. राजकीय वातावरण अत्यंत घाणेरडं आहे. कुणाच्या मागे कोणतीही एजन्सी लावली जात आहे.
मुंबई : शिवसेना सोडून काही जण शिंदे गटात गेलेत. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, जे निष्ठावंत आहेत. ज्यांना जायचं असते मग ते खोक्यांसाठी असो की ठोक्यांसाठी त्यांना पर्याय नसतो. महाविकास आघाडीच्या काळात कोविड योग्य पद्धतीनं हाताळलं गेलं होतं. शास्वत विकास या राज्याचा झाला. चांगली गुंतवणूक या महाराष्ट्रात आली. नोकऱ्यांच्या संधी राज्यात वाढत होती. या सगळ्या गोष्टी ज्यांना आवडतात ते आमच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं.
युवा बेरोजगार आहे. महिलांचा आवाज ऐकला जात नाही. शेतकऱ्यांचा आवाज ऐकला जात नाही. फक्त दिल्लीचा आवाज ऐकला जातो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
बेरोजगार युवक, महिला इनका आवाज सुनते नहीं, सुनते है तो सिर्फ दिल्ली का यही दुःख हैं महाराष्ट्र का, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी लगावला.
राजकीय पातळी घसरली आहे. जीडीपी घसरायला सहा महिन्यांपूर्वी केळाचं साल टाकलं कुणी. नवीन गुंतवणूक येताना दिसत नाही. काही एमओयू राज्यात गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत.
महाराष्ट्रात येण्यासाठी कुठलाही गुंतवणूकदार इच्छुक नाही. कारण एक सीएम आणि एक स्पेशल सीएम आहे. राजकीय वातावरण अत्यंत घाणेरडं आहे. कुणाच्या मागे कोणतीही एजन्सी लावली जात आहे.
सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढं कसं नेता येईल, यावर विचार केला पाहिजे. धोका देऊन येणार सरकार लवकरच पडणार आहे. पुढचं सरकार महाराष्ट्राच्या हिताचं यावं, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.