रश्मी ठाकरेंशी पार्टनरशीप आहे का? सर्वात मोठ्या आरोपावर नाईक कुटुंबाचं पहिलंच थेट उत्तर
माझे वडील हे वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होते. त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. | Rashmi Thackeray and anvay naik
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन भाजपकडून होणाऱ्या आरोपांसंदर्भात नाईक कुटुंबीयांकडून पहिल्यांदाच थेट उत्तर देण्यात आले. मुळात हा व्यवहार आठ ते दहा वर्षांपूर्वीचा आहे आणि जमीन खरेदी किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे का? या व्यवहाराचा आणि अन्वय नाईक मृत्यूप्रकरणाचा संबंध आत्ताच का जोडला जात आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला. (Rashmi Thackeray and Anvay Naik land deal)
अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. माझे वडील हे वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होते. त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. अगदी शेवटपर्यंत ते प्लॉटिंग करुन जमिनी विकायचे काम करत होते. यामध्ये गैर ते काय आहे? भाजप नेत्यांकडून आरोप होत असलेल्या जमिनीच्या सर्व सातबाऱ्यांची माहिती द्यायला आम्ही तयार आहोत. अगदी आमच्या बँकेचे तपशीलही आम्ही सादर करु. मात्र, या प्रकरणातील आरोपींनीही (अर्णव गोस्वामी) त्यांच्या बँक खात्याचे तपशील सादर करावेत. प्रसारमाध्यमांसमोर एकदा चाय पे चर्चा होऊनच जाऊ दे, असे अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी म्हटले.
‘किरीट सोमय्यांचा जीव वर-खाली का होतो?’
याप्रकरणात आमची दोन माणसं गेली आहेत, म्हणून आमचा जीव वर-खाली होतो. तर अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे ते आमच्यावर आरोप करतात. मात्र, याप्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जीव इतका वर-खाली का होत आहे, याचे कारण आम्हाला अद्याप समजलेले नाही, असे आज्ञा नाईक यांनी म्हटले.
‘आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास, शिवसेनेनेच आम्हाला मदत केली’
या संपूर्ण प्रकरणात आम्हाला शिवसेनेने मदत केली आहे. आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळावा, एवढीच आमची इच्छा आहे. कुणाला सीबीआय किंवा अजून कुठली चौकशी करायची असेल, तर ती खुशाल करावी, असे अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने सांगितले.
संबंधित बातम्या:
फडणवीसांना CDR मिळतो, मग आम्हाला का नाही? देवेंद्र फडणवीस दिशाभूल करतायत, नाईक कुटुंब संतापलं
रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा
(Rashmi Thackeray and Anvay Naik land deal)