“इथं पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही, पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ?”: जयश्री पाटील

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाराजीमुळे अ‌ॅड. जयश्री पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. (jayashree patil fir anil deshmukh)

इथं पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही, पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ?: जयश्री पाटील
JAYASHREE PATIL
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 7:20 PM

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर आज (24 एप्रिल) छापेही मारण्यात आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif) यांनी सीबीआयच्या या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या शंकेमुळे अ‌ॅड. जयश्री पाटील (advocate Jayashree Patil) चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी “मुश्रीफ यांना सांगायचंय, की येथे पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही. पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ? जे पुढे येऊन रोज बोलत आहेत. त्या सगळ्यांची नावे पुढे येणार आहेत,” अशा कठोर शब्दांत टीका केली. त्या मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या. (advocate Jayashree Patil criticizes Hasan Mushrif and Sanjay Raut on FIR filed against former Home Minister Anil Deshmukh)

“संजय राऊत, हसन मुश्रीफ, जयंत पाटीलांनी ऑर्डर वाचावी”

यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर परखड शब्दांत टीका केली. “हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार परिच्छेद 41, 82, 83 नुसार सीबीआयला कारवाईचे आदेश आहेत. संजय राऊत, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कोर्ट ऑर्डर वाचावी. त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. यांनी दिशा भरकटवण्याचं काम करु नये. तसेच ऊच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा प्रसार करू नये,” असे जयश्री पाटील म्हणाल्या.

“अनिल देशमुखांना वाचवणाऱ्यांवरसुद्धा कारवाई होणार”

अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सीबीआयच्या कारवाईवर शंका उपस्थित केली. त्यांनी देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल असून याप्रकरणी लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्यावर पाटील यांनी भाष्य केले. ” मला मुश्रीम यांना सांगायचंय, की येथे पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही. पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ? जे पुढे येऊन रोज बोलतात, त्या सगळ्यांची नावे पुढे येणार आहेत. जे अनिल देशमुख यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावरही येत्या दिवसात कारवाई होणार,” असे जयश्री पाटील म्हणाल्या.

“मला धमकी देतात, माझ्याही जिवाला धोका”

यावेळी पुढे बोलताना जयश्री पाटील यांनी त्यांचा जीवाला धोका असल्याचा दावा केला. “अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला, हा सत्याचा विजय आहे. कोणीही कोर्टाच्या कारवाईत हस्तक्षेप करु नये. तसेच कोणीही कायद्याबाबत दिशाभूल करत असेल तर ते सहआरोपी होऊ शकतात. अनेकजण मला धमकी देत आहेत. माझ्याही जिवाला धोका आहे, ऊद्या हे माझ्या कुटुंबाचा घात करू शकतात. त्यामुळे सीबीआयने तातडीने कारवाई करावी,” असे जयश्री पाटील म्हणाल्या.

अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा 

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. तसेच सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी केल्याचंसुद्धा सूत्रांनी सांगितलं.

इतर बातम्या :

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणतात…

CBI raid on Anil Deshmukh Live : अनिल देशमुख यांची जवळपास दहा तास चौकशी

(advocate Jayashree Patil criticizes Hasan Mushrif and Sanjay Raut on FIR filed against former Home Minister Anil Deshmukh)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.