टीव्ही9 मराठीचा खास रिपोर्ट : 2014 नंतर आपण मोदींमुळेच जगतोय, जितेंद्र आव्हाडांचा टोला!
भाजपच्या आणखी एका नेत्यानं मोदींविषयी एक वक्तव्य केलं. आपण जो श्वास घेतोय, तो मोदींमुळेच घेतोय असं रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत. पाह टीव्ही9 मराठीचा खास रिपोर्ट.
मुंंबई : कोरोनाची लस पंतप्रधान मोदींनी तयार केली असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केलं होतं. त्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. आता भाजपच्या आणखी एका नेत्यानं मोदींविषयी एक वक्तव्य केलं. आपण जो श्वास घेतोय, तो मोदींमुळेच घेतोय असं रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत. पाह टीव्ही9 मराठीचा खास रिपोर्ट.
आपण जो श्वास घेतोय तो फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदींमुळंच घेतोय असं वक्तव्य भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाणांनी केलंय. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात 9 वर्षात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडत होते. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही असंच एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली होती.
पाहा व्हिडीओ-
उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देताना ठाकरेंवरच टीका केली होती. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनीही पंतप्रधान मोदींबद्दल आश्चर्यचकित करणारं वक्तव्य केलं होतं. मोदींनी लस तयार केली, मोदींमुळंच आपण श्वास घेतोय. भाजप नेत्यांच्या या वक्तव्यांची विरोधक मात्र खिल्ली उडवू लागले आहेत.