#विसरलानाहीमहाराष्ट्र! अशोक चव्हाणांच्या पक्षांतरांच्या चर्चेदरम्यान आदर्श घोटाळ्यावरील भाजपचं ते जुनं ट्विट व्हायरल

काँग्रेल पक्षाला मोठं खिंडार पडलं असून अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक चव्हाण आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांदरम्यान भाजपचं जुनं ट्विट व्हायरल झालं आहे.

#विसरलानाहीमहाराष्ट्र! अशोक चव्हाणांच्या पक्षांतरांच्या चर्चेदरम्यान आदर्श घोटाळ्यावरील भाजपचं ते जुनं ट्विट व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 4:27 PM

मुंबई : महाराष्ट्राराच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. अशोक चव्हाण यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा होत असताना भाजपने केलेलं जुनं ट्विट व्हायरल होत असलेलं पाहायला मिळत आहे.

काय आहे भाजपचं जुनं ट्विट?

आदर्श घोटाळा, 4 मजली बांधली जाणारी इमारत 31 मजली बनली. त्यातील घरे शाहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी होती. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ती हडप केली. यात अशोक चव्हाण व सुनील तटकरे यांचा वाटा होता, असं भाजपने 30 मे 2019 साली ट्विट केलं होतं. #विसरलानाहीमहाराष्ट्र या ट्विटमधून भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता.

आदर्श घोटाळा

आदर्श इमारत आधी चार मजल बाधण्याचं ठरलं असताना शेवटी ३२ मजली बनली त्यातील घरे शहीद सैनिकांच्या कुटंबियांसाठी होती. पण तत्कालीन नेत्यांनी ही घरे हडप केली. यामध्ये काँग्रेसचे आदर्शोक चव्हाण, भ्रष्टवादीचे सुनील तटकरे यांसारख्या नेत्यांचा सहभाग होता, असा मजकूर असलेलं ग्राफिक्स भाजपने शेअर केलं होतं.

अशोक चव्हाण यांनी आपण भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपली राजकीय भूमिका जाहीर करेलं. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंं. तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये गेले तर विरोधी पक्ष भाजपला धारेवर धरू शकतो.

आदर्श घोटाळ्यावरून राऊतांंचा निशाणा

अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेसमुळे आहेत. त्यांना भाजपमध्ये जाऊन आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल, असं म्हणत संजय राऊत यांनी चव्हाणांवर निशाणा साधलाय.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...