राज्यपालांचे सूर बदलले, वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांची स्तुतीसुमनं…
भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या माणसांनी देशाला समृद्ध केले आहे असंही मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबईः काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केल्यामुळे वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारे विधान केले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, शिवराय, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भारताची संस्कृती आजरामर आहे असंही त्यांनी बोलताना सांगितले आहे.
भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या माणसांनी देशाला समृद्ध केले आहे असंही मत त्यांनी व्यक्त केले.
भारतातील क्रांतीकारी लोकांमुळेच भारत आज स्वाभिमानाने जगात उभा आहे. या क्रांतिकारी लोकांमुळे देशाची संस्कृती जगभरात अमर असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी, शरद पवार यांची तुलना केली होती. त्यामुळे राज्यात प्रचंड वाद उफाळून आला होता. शिवसेने काँग्रेस, राष्टवादी पक्षांकडून राज्यपाल आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी, शरद पवार यांची तुलना केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी शिंदे गटाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर आजच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा गौरव करुन त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.