मोठी बातमी ! मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज गहाळ, डीव्हीआर गायब?

मुंबई पोलीस मुख्यालयातील काही दिवसांचा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाल्याचे माहिती पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले आहे. (mansukh hiren cctv data disappeared)

मोठी बातमी ! मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज गहाळ, डीव्हीआर गायब?
मनसुख हिरेन आणि सीसीटीव्हीचा सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 7:28 PM

मुंबई : उद्योजग मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. नुकताच या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर आता या प्रकरणाशी निगडीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस मुख्यालयातील काही दिवसांचा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाल्याचे माहिती पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूनंतर हा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाला आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज स्टोअर केलेला डीव्हीआरसुद्धा ( Digital Video Recorder) गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. या नव्या माहितीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. (after death of Mansukh Hiren CCTV data disappeared from Mumbai police commissioner office)

पोलीस मुख्यालयातील डीव्हीआर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. हिरेन यांचा मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवला. त्यानंतर या प्रकरणातील सर्व धागेदोरे जमवण्याचे काम एटीएसने केले. आपल्या तपासानंतर हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचे रहस्य उलगडल्याचा दावा एटीएसने काही दिवसांपूर्वी केला. मात्र, त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. सध्या हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी एनएयए करत आहे. या पार्श्वभूमीवर आता नवी माहिती समोर येत आहे. मनसुख यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस मुख्यालयातील काही दिवसांचा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज स्टोअर केलेला डीव्हीआरसुद्धा गायब झाल्याची माहिती आहे. ही माहिती पोलीस दलातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

डीव्हीआर म्हणजे काय?

डीव्हीआर म्हणजेच डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर होय. या यंत्रणेशी अनेक कॅमेरे जोडता येतात. तसेच डिव्हीआरमुळे सुसूत्रता बाळगता येतात. डीव्हीआर हे एक हार्डडिस्क असून त्याच्यामार्फत एकाच वेळी अनेक कॅमेऱ्यांमधून व्हिडीओ रेकॉर्डिंग सेव्ह करता येऊ शकते. डीव्हीआरच्या माध्यमातून अनेक सीसीटीव्हींचे फुटेज कॉम्प्यूटर नेटवर्कवर पाठवता येऊ शकतात. डीव्हीआरच्या माध्यमातून कोणताही डेटा पॉज किंवा जलद गदतीने पाहता येतो.

हिरेन मृत्यू प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

दरम्यान, डीव्हीआर आणि काही सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे समोर येण्याआधी आज (26 मार्च) भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. हिरेन यांचा पोस्टमार्टमच्या अहवालात त्यांच्या तोंडात कोंबलेल्या रुमालाचा उल्लेखच नाहीये. हा उल्लेख का केला नाही? हे रुमाल कुणी पळवले आहे? तसेच याप्रकरणातील पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले. गेल्या काही दिवसात जे काही राज्यात सुरू आहे, त्याची उत्तरे राज्य सरकारला द्यावी लागतील. मनसुख हिरेन प्रकरण एनआयएकडे जाऊ नये असाच राज्य सरकारचा प्रयत्न होता. मात्र ठाणे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर एनआयएकडे हा तपास देण्यात आला. एटीएसला हा तपास आपल्याकडेच ठेवायचा होता. त्यामागे पुरावे नष्ट करणे आणि चौकशीची दिशा भरकटवण्याचा त्यामागे कुहेतू होता का? असा सवाल शेलार यांनी केला.

इतर बातम्या :

achin Vaze Case : एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली?, कुणी केली? वाझेंचा संबंध काय?; वाचा, ATS नं काय सांगितलं?

ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, ‘त्या’ 5 बॅगांमध्ये काय; ‘एनआयए’कडून कसून चौकशी

(after death of Mansukh Hiren CCTV data disappeared from Mumbai police commissioner office)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.