मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांनी गौप्यस्फोट केला.आता पहाटेच्या शपथविधीआधीच्या एक एका घटनेकडे बोट दाखवलं जातंय. मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी मोदी आणि पवारांच्या भेटीत काय ठरलं होतं ? असा सवाल केलाय.
प्रकाश महाजन म्हणाले देवेंद्र फडणवीसांच्या स्फोटक गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात असा काही धमका झाला वेगवेगळे अँगल आता समोर येत आहेत. शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतरच, अजित पवारांसोबत शपथविधी झाला, असं फडणवीस म्हणालेत.
अर्थात खुद्द शरद पवारांनीच फडणवीसांचा दावा फेटाळला पण मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी पहाटेच्या शपथविधी आधी मोदी
पहाटेचा शपथविधी 23 नोव्हेंबर 2019ला झाला. पहाटेच्या शपथविधीआधी 20 नोव्हेंबर 2019ला शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आणि सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या जवळपास 40 मिनिटं मोदी आणि पवारांमध्ये बैठक झाली. एकीकडे महाविकास आघाडीच्या निर्मितीची बैठक होत होती..तर मग मोदी आणि पवारांमध्ये बैठक कशी काय ? यावर उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या होत्या. त्यामुळंच फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटात दम आहे, असं प्रकाश महाजन म्हणालेत.
काश महाजनांचा थेट सवाल आहे की, पवार आणि मोदींचं काय ठरलं होतं. दिल्लीतल्या मोदींसोबतच्या बैठकीनंतर 3 दिवसांतच अजित पवारांनी फडणवीसांसोबत हातमिळवणी केली आणि पहाटेचा शपथविधी करत महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणला होता. त्यावेळी अजित पवारांचं म्हणणं होतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांचं सरकार चालणार नाही.
आता फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर, पुन्हा शरद पवारांची मोदींसोबतची बैठक चर्चेत आली. विशेष म्हणजे त्यावेळी पवारांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोदींना भेटल्याचं म्हटलं होतं. पण महिन्याभरानंच म्हणजे 2 डिसेंबरला, या बैठकीतलं सत्य स्वत: शरद पवारांनीच सांगितलं होतं. मोदींनी पवारांना सोबत काम करण्यासंदर्भात ऑफर दिली होती, असा खुलासाही पवारांनीच केला होता. सुप्रिया सुळेंना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यासंदर्भातही शब्द दिला होता पण आपणच ऑफर नाकारल्याचं पवार त्यावेळी म्हणाले होते..
ज्या 1978च्या घटनेचा, प्रकाश महाजन उल्लेख करत आहेत ते प्रकरण वसंतदादा पाटलांचं आहे. त्यावेळी सत्ताधारी पक्षातच असलेल्या पवारांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन वसंतदादांचं सरकार पाडलं होतं. तर आता राजकीय स्टेटमेंट करुन फडणवीसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. चंद्रशेखर बावनकुळे11.59AM PUNE AVI BAWANKULE
TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांनी अटकेचा डाव होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं खोटी कागदपत्रं तयार केली होती, असाही दावा केला. फडणवीसांचा हाही दावा फेटाळताना राऊतांनी फडणवीसांना डिवचलंय. मार्च 2021 मध्ये मविआच्या काळात गृहविभागात बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता तशी तक्रार त्यांनी केंद्रीय गृहविभागाकडेही केली होती.
दरम्यान गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणात फडणवीसांचीच त्यांच्या सागर बंगल्यावर जावून 2 तास पोलिसांनी चौकशी केली होती. त्याचाच उल्लेख आता संजय राऊत करतायत.