‘या’ आमदारामुळे मंत्री सावंत यांना फुटला मायेचा पाझर; सगळी यंत्रणाच लावली कामाला…
आमदार सरोज अहिरे यांनी हिरकणी कक्षाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली होती. ही गोष्ट सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना समजली होती.
मुंबईः राज्य सरकारच्या आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांनी हे अधिवेशन गाजत असताना नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी विधानभवनातील हिरकणी कक्षाची बकाल अवस्था पाहिल्यानंतर त्या तिथून पुन्हा माघारी फिरल्या होत्या. हिरकणी कक्षा पाहून त्यांनी त्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली होती, त्याची बकाल अवस्था पाहून त्यांना अश्रुसुद्धा अनावर झाल्या होत्या.
यावेळी त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या याठिकाणी मांडण्यासाठी आले असले तरी माझ्या सोबत बाळ असल्यामुळे त्याची येथे गैरसोय होत असल्याचेही त्यांनी आपली खंत व्यक्त केली होती. हिरकणी कक्षाची सोय झाली नाही तर मला पुन्हा माझ्या गावी जावे लागले असंही त्यांनी सांगितले होते.
मात्र त्यांची ही खंत सार्वजनिकआरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना समजताच त्यांनी सरोज अहिरे यांच्याबरोबर संवाद साधून त्यांनी तुमच्यासाठी हिरकणी कक्ष योग्य अवस्थेत उपलब्ध करुन देण्यात येईल असा शब्दही त्यांना देण्यात आला.
आमदार सरोज अहिरे यांनी हिरकणी कक्षाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली होती. ही गोष्ट सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना समजली होती.
त्यानंतर त्यांनी सरोज अहिरे यांच्याबरोबर दूरध्वनीहून संपर्क साधला होता. त्यानंतर तानाजी सावंत यांनी येत्या चोवीस तासाच्या आत आया, नर्स, डॉक्टरसह सुसज्ज असा हिरकणी कक्ष तयार असेल याची ग्वाहीही त्यांना देण्यात आली.
मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी सरोज अहिरे यांच्या भावना समजून घेऊन त्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत चोवीस तासात तुमच्यासाठी योग्य ती सोय करून देण्यात येईल असा शब्दही तानाजीराव सावंत यांनी दिला आहे.