Sanjay Raut : मनसेच्या राड्यानंतर संजय राऊत म्हणाले, हात जोडून विनंती करतो की… नेमकी प्रतिक्रिया काय?

Sanjay Raut on MNS : काल मनसेच्या राड्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. अंधारातून हल्ला करणाऱ्यांना त्यांनी सज्जड इशारा दिला आहे. या हल्ल्यामागे दिल्लीश्वराचा हात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. या पक्षीय भांडणात त्यांनी नेमकी काय दिली प्रतिक्रिया?

Sanjay Raut : मनसेच्या राड्यानंतर संजय राऊत म्हणाले, हात जोडून विनंती करतो की... नेमकी प्रतिक्रिया काय?
संजय राऊत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 11:21 AM

बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. बीडमध्ये सुरूवात झाली आता मुंबईत शेवट करू, असा इशारा मनसैनिकांनी दिला होता. त्याचा प्रत्यय काल ठाण्यात पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या तफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे सेना भिडली. त्यावर आज संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक मोलाचा सल्ला पण दिला आहे. काय म्हणाले संजय राऊत?

ते तर दिल्लीच्या अब्दालीची माणसं

भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजागी स्वागत झालं. ठाण्यात झालं. सभागृह भरगच्च होतं. भगवा सप्ताह ज्या पद्धतीने साजरा व्हायला व्हावा तसा तो साजरा झाला. त्यानंतर जो प्रकार झाला. ते दिल्लीच्या अब्दालीचे लोकं होते. अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपारी दिल्या त्यातील एक सुपारी होती, असा घणाघात राऊत यांनी घातला.

हे सुद्धा वाचा

हात जोडून विनंती की…

बीडमध्ये मनसेप्रमुखाबाबत प्रकार घडला. त्यांच्या गाडीवर कुणी तरी काही फेकलं. त्याचा शिवसेनेचा काही संबंध नाही. स्थानिक लेव्हलला मराठा म्हणून आंदोलन झालं. त्याची प्रतिक्रिया आहे. पक्षाचा संबंध नाही. पण कालच्या प्रकाराला अॅक्शन रिअॅक्शन म्हणता कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल. माझी त्यांना पक्षातर्फे हात जोडून विनंती आहे. तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकलं असेल म्हणून तुम्ही वाचला. जर तुम्ही मर्दाची औलाद असता तर समोर आले असते. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, पक्षाकडून, शिवसैनिकांकडून की , पुन्हा अशी कृत्ये अंधारात, लपूनछपून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका. तुमच्या घरात तुमचे आईवडील वाट पाहत आहेत. तुमची मुलंबाळं वाट पाहत आहे. तुमची पत्नी वाट पाहत आहेत, असा इशारा त्यांनी दिला. मराठी लोकांमध्ये मारामारी लावण्याचं काम अब्दाली करत आहेत. त्यासाठी काही कोटींची सुपारी राज्यातील तीन नेत्यांना दिली आहे. त्यांचं काम गेल्या काही काळापासून सुपारी घेऊन केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

ठाण्यातील वातावरण बदलत आहे

या स्तरावर येत असाल, अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या देऊन वाट पाहत आहेत, महाराष्ट्रात आपआपसात गोंधळ करण्यासाठी अब्दालीने तीन नेत्यांना सुपारी दिली. पण काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. ठाण्यातील वातावरण बदलत आहे. विधानसभेत आमचं दमदार पाऊल पडत आहे, असा दावा त्यांनी केला.

तर शिवसैनिक काय आहे हे दिसलं असतं

पण त्यात अशा प्रकारे दुष्ट लावण्याचं काम अब्दालीचे लोक करतात. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही. फक्त महाराष्ट्राचे शत्रू अब्दालीच्या इशाऱ्यावर चालले आहे. हे फडणवीस आणि शिंदेंना माहीत आहे. तुम्ही ॲक्शन रिॲक्शन काय म्हणता. थांबा दोन महिने तुम्हाला कळेल. सत्तेची मस्ती दाखवू नका. नशीब त्यांचं ते समोर आले नाही. गांडू सारखं काळोखात लपून करत आहेत. समोर असते तर शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं, असा खणखणीत इशारा त्यांनी यावेळी दिला.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.