Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हाचा प्रफुल्ल पटेलांनी केला सर्वात मोठा खुलासा

एमईटीमध्ये अजित पवार गटातील नेत्यांनी भाषणे पार पडत आहेत. यावेळी अजित पवार गटाचं नेतृत्त्व करत असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हाचा सर्वात मोठा खुलासा केला आहे. 

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हाचा प्रफुल्ल पटेलांनी केला सर्वात मोठा खुलासा
NCP Ajit pawar group
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 2:29 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणचा? शरद पवार की अजित पवार? हे आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची बैठक पार पडत आहे. तर वांद्रे येथील एमईटी येथे अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. आता दोन्ही ठिकाणांचं चित्र पाहता अजित पवारांच्या आयोजिते केलेल्या बैठकीला आतापर्यंत 32 आमदारांनी उपस्थिती लावली आहे. एमईटीमध्ये पवार गटातील नेत्यांनी भाषणे पार पडत आहेत. यावेळी अजित पवार गटाचं नेतृत्त्व करत असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हाचा सर्वात मोठा खुलासा केला आहे.

महाविकास आघाडी बनली त्यावेळी शिवसेना कोणासोबत होती. आपण वैचारिक म्हणतो मग आपण भाजपसोबत गेलं तर काय चुकीचं केलं. कारण महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना सर्वात जास्त विरोध आणि शिवीगाळ ही शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी केली होती. महाविकास आघाडी सरकार पडणार होतं, त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी साहेबांना आपण भाजपसोबत जावू असं म्हटलं होतं. त्यामुळे दादाने आता पिल्लू सोडलेलं आहे  असं काही नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

मी माझ्या पुस्तकामध्ये सर्व काही खुलासा केला आहे. त्यामध्ये देशाला आणि महाराष्ट्राला काय समजेल ते आता सांगण्याची गरज वाटत नाही. प्रफुल्ल पटेल म्हणजे साहेबांची सावली मात्र आता मी अजित दादासोबत आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या. कारण आम्ही अजूनही आमच्या देवाला मानतो असल्याचं पटेल म्हणाले.  तर याआधीच्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी थेट पवारांच्या जवळ असणाऱ्या नेत्यांना बडवे म्हणत निशाणा साधला.

छगन भुजबळ काय म्हणाले?

शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण त्यांना पक्षातील काही बडव्यांनी घेरलं आहे. साहेब, या बडव्यांना दूर करा. आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्यासोबत येतो. आपण सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या विकासाचं काम करू, असं छगन भुजबळ म्हणाले.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.