मोठी बातमी : अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित; दादांच्या मनात नेमकं काय?
Ajit Pawar absent in Amit Shah Daura : अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित आहे. त्यांच्या या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. तसंच सध्या गणेशोत्सव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी भाजपची महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार काल बारामतीत होते. पण काल रात्री ते मुंबईत आले. त्यानंतर अजित पवार अमित शाहांना भेटणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अद्यापपर्यंत त्यांची भेट झाली नसल्याचं समोर आलं आहे. मुंबईत असतानाही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट न झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
महायुतीत नेमकं काय घडतंय?
देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. सध्या सगळीकडे गणेशोत्वाचा उत्साह आहे. त्यानिमित्त अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच्या गणरायाचं देखील त्यांनी दर्शन घेतलं आहे. तसंच आशिष शेलार यांच्या घरीही त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.
काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. तर वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. अजित पवार आज मुंबईत आहेत. मात्र त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतही अजितदादा अनुपस्थित
5 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीलाही अजित पवार उपस्थित नव्हते. काल बारामतीतील कसब्यात असणाऱ्या ‘राष्ट्रवादी भवन’मध्ये काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी अजित पवार उपस्थित होते. हा बारामती दौरा आटोपता घेत अजित पवार तातडीने मुंबईत आले. मात्र मुंबईत असूनही अजित पवारांनी अमित शाहांची भेट न घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.