Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : दिल्लीत गेले कशासाठी? राजधानीत मुक्काम कशासाठी? अजितदादांनी टाकलं सगळं सांगून…

Ajit Pawar on Delhi Stay : राज्यात विविध घडामोडी घडत असताना, अजित पवार दिल्लीत डेरे दाखल झाल्याने माध्यमात उलटसुलट चर्चा रंगल्या. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होत असतानाच दादा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त येऊन धडकल्याने गोंधळ उडाला होता. त्यावर आता अजितदादांनी आता भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar : दिल्लीत गेले कशासाठी? राजधानीत मुक्काम कशासाठी? अजितदादांनी टाकलं सगळं सांगून...
अजितदादांचा दिल्ली मुक्काम कशासाठी?
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 4:18 PM

राज्यात बहुमत मिळवूनही महायुतीने सरकार स्थापन करण्यासाठी मोठा कालावधी घेतला. मुख्यमंत्री दिल्लीतील बैठकीनंतर त्यांच्या मूळ दरे या गावी गेले. तिथून ते ठाण्याच्या घरी गेले. या दरम्यान महायुतीच्या बैठकी झाल्या नाहीत. तीनही पक्षाचे नेते एकत्र दिसले नाही. त्यावरून राज्यात वेगळ्याच चर्चा रंगल्या. शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तर दुसरीकडे अजितदादांनी तातडीने दिल्ली गाठल्याने चर्चांना उधाण आले. अजितदादा अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आल्यानंतर राज्यात काहीतरी मोठं नाट्य घडतंय अशा चर्चा झाल्या. या सर्व प्रकरणावर आता अजितदादांनीच पडदा टाकला आहे. त्यांनी दिल्लीत मुक्काम कशासाठी ठोकला हे दिलखुलासपणे सांगून टाकले. त्यांनी जर-तरच्या चर्चांना आपल्या रोखठोक उत्तराने विराम दिला. काय म्हणाले अजितदादा?

काय केला खुलासा

दिल्लीवारीविषयी आज महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी खुलासा केला. “मी नवी दिल्लीत माझ्याकामासाठी गेलो होतो. मी कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. माझी पत्नी सुनेत्रा यांना ११ जनपथ हा बंगला दिला आहे. मला घर नीटनेटकं लागतं. त्यामुळे मी आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो. आमच्या केसेस चालू आहेत. त्याबद्दल वकिलांना कधी भेटलो नव्हतो. ते प्रफुल्ल पटेल बघायचे. तो विषय संपवा म्हणून वकिलांना भेटलो होतो. जवळच्या नातेवाईकांचं लग्न होतं. या तीन गोष्टीसाठी गेलो होतो. तसेच तिकडे गेल्यावर आराम करायला मिळतो. त्यामुळे मी अमित शाह यांना भेटायला गेलो होतो डोक्यातून काढून टाका.” असे अजितदादा म्हणाले. इतकेच नाही तर तुम्ही मात्र मला अमुक नेत्याने भेट नाकारली वगैरे बातम्या चालवल्या, असा टोला ही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

कोणी नाराज होणार नाही

पुढील पाच वर्षांत महायुती म्हणून काय करणार याची रुपरेषा अजितदादांनी थोडक्यात मांडली. या सरकारमध्ये कोणीही नाराज नसेल. रूसवे-फुगवे काढायचे काम पडणार नाही, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला. “आम्हाला अनुभव आहे. आम्ही राज्याचा विकास चांगला करू. राज्याला कसा फायदा देऊ हे पाहणार आहे. नैसर्गिक संकटं येत असतात. केंद्र सरकार सोबत होतं. पाच वर्ष हातात आहे. चांगलं बहुमत आहे. हा रूसला तो फुगला. याला सांभाळा त्याला सांभाळा वगैरे करण्याचं काम करण्याची गरज पडणार नाही. कोणी नाराज होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे ही जबाबदारी पार पाडतील. जी आश्वासने दिली ती पार पाडण्याचं काम करू. राज्याचा देशात नावलौकिक आहे. तो आम्ही देशात नेऊ. नंबर एकचं राज्य करू.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'.
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी.
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा.
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले.
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार.
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा.
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा.
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर.
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर.