Mahayuti : अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, शिंदे गटातील या बड्या नेत्याला अमोल मिटकरींचा टोला, महायुतीत धुसफूस वाढली

Amol Mitkari : लोकसभा निकालानंतर महायुतीत धुसफूस वाढली आहे. त्यात अजित पवार गटाला टार्गेट करण्यात येत असल्याचे नेत्यांच्या वक्तव्यावरुन तरी समोर येत आहे. भाजप आणि शिंदेसेनेतूच दारुगोळा डागण्यात येत आहे.

Mahayuti : अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, शिंदे गटातील या बड्या नेत्याला अमोल मिटकरींचा टोला, महायुतीत धुसफूस वाढली
अमोल मिटकरी यांचा शिंदेसेनेवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 3:31 PM

लोकसभा निकालानंतर महायुतीत बेबनाव असल्याचे वृत्त खरे तर नाही ना? असे नेत्यांच्या वक्तव्यावरुन समोर येत आहे. गेल्या आठवडाभरापासून अजित पवार गटाला महायुतीत टार्गेट करण्यात येत असल्याचे नेत्यांचे वक्तव्य तपासल्यावर समजते. भाजप आणि शिंदेसेनेत अजित पवार गटाविषयी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्याचा आरोप काही भाजप आमदारांनी केल्याचे समजते. तर या आरोपांना अजित पवार गोटातून पण प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

भाजप गोटातून हल्ला

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरने पहिल्यांदा अजित पवार गटावर तोफ डागली होती. निकालानंतर लागलीच भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच राज्यात भाजपचा पराभव झाला असे लेखात म्हटले होते. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने किंमत कमी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या बैठकीत सुद्धा काही आमदारांनी दादांना सोबत घेतल्याने नाराजीचा सूर आळवला होता.

रामदास कदम यांनी टाकला बॉम्ब

शिंदेसेना पण अजित पवारांना सोबत घेण्यावरुन नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातच रामदास कदम यांनी बॉम्ब टाकला. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तरी चाललं असतं, असा चिमटा कदमांनी काढला. त्यामुळे आता महायुतीत अजित पवार गटाविषयी धुसफूस वाढल्याचे समोर येत आहे. महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

तुमची लंगोटी तरी वाचली

अजित पवार गटावर वारंवार महायुतीतूनच एकाएक हल्ले वाढले आहेत. त्याला पवार गटातून पण प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. रामदास कदम, आपण जोरात बोललात .”मागून आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं” माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका.” असा खरमरीत टोला मिटकरी यांनी कदम यांना हाणला.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.