“तुम्ही मान्य करा, आमच्या चुका झाल्या”; नागपूरच्या निकालावर या नेत्यानं भाजपला टोला लगावला…
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर बोलतान अजित पवार यांनी मात्र कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागतो. तो आपण खुल्या दिलाने मान्य केला पाहिजे, जर पराभव झाला तर आपल्या चुका झाल्या,
मुंबईः पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा काल निकाल लागल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळी मत व्यक्त होत राहिली. या निवडणुकीत नाशिक आणि नागपूर मतदार संघाकडे मात्र सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच नागपूर विभागाची जागा महाविकास आघाडीने जिंकल्यामुळे त्या ठिकाणचा पराभव हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा मानला जात आहे. त्या प्रकारची टीकाही भाजपच्या विरोधकांनी केल्या आहेत.
त्यामुळे त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, नागपूरची जागा ही भाजप लढली असती तर 100 टक्के जिंकली असती असं स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
तर यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले की, जो निकाल लागतो, जर अपयश आले तर ते दिलदारपणे मान्य केले पाहिजे असा टोला भाजपला अजित पवार यांनी लगावला आहे.
नागपूरच्या निकालावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा जो निकाला लागला आहे. तो निकाला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा पराभव असल्याचे चित्र रंगवले जात आहे.
मात्र तसे नसून ही जागा भाजपकडून लढवली गेली असती तर मात्र त्या जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून आला असता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर बोलतान अजित पवार यांनी मात्र कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागतो. तो आपण खुल्या दिलाने मान्य केला पाहिजे, जर पराभव झाला तर आपल्या चुका झाल्या,
त्या पुढील काळात आम्ही दुरुस्त करू आणि चुका सुधारू असंही स्पष्ट केले पाहिजे. राजकारणात जो निकाल लागेल तो मात्र आपण दिलदार पणे मान्य केलाच पाहिजे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.