Ajit Pawar यांचं थेट शरद पवार यांना आव्हान, पाहा काय म्हणाले दादा…

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवारांनी पक्षावर दाव सांगत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. 

Ajit Pawar यांचं थेट शरद पवार यांना आव्हान, पाहा काय म्हणाले दादा...
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 4:18 PM

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजाच्या  राजकारणात मोठा भूकंप केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवारांनी पक्षावर दावा सांगत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. अजित पवार यांनी पक्षासह चिन्हावर निवडणुका लढणार असल्याचं सांगितलं आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

विरोधी पक्षांची बैठक होते त्यामध्ये आऊटपूट काही निघत नाही. भारत देशाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. याचा विचार करता आम्ही सगळ्यांनी तशाप्रकारचा निर्णय घेतलं. आज शिंदे-फडणवीस सरकारचं काम करत आहे. मी इतके दिवस विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी माझी भूमिका स्पष्ट केल्याचं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गेले 24 वर्षांपासून छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल किंवा सगळ्यांनीच शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आगामी काळात तरुणांना संधी देण्याची जास्त आवश्यकता आहे. त्या संदर्भात वेगवेगळे विझन आहे. त्या विझनमध्ये नवे कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजेत. त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.

मी मागे अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असताना आम्ही सगळ्यांनी विकासाचा विचार करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी पक्ष माझ्यासोबत, पक्ष आणि चिन्ह माझ्याकडेच असून येणाऱ्या निवडणूका आम्ही राष्ट्रवादीकडूनच लढणार आहोत. आम्ही वास्तविक साडेतीन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता त्याहीवेळेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार होतं. आम्ही सगळ्यांनी काम केलं. त्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार, आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचं सांगितलं आहे. आता काहीच वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.