Ajit Pawar : अजित पवार गटाची मोठी ‘खेळी’; विधानसभेसाठी काँग्रेसच्या पाऊलावर असे टाकले पाऊल, निवडणुकीची अशी ठरवली रणनीती

Congress Vidhan Sabha Poll Strategy : तर लोकसभेचा वचपा काढण्यासाठी अजित पवार गटाने मोठी खेळी खेळली आहे. जुन्या चुका टाळण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने सुरुवात केली आहे. काय आहे त्यांची तयारी?

Ajit Pawar : अजित पवार गटाची मोठी 'खेळी'; विधानसभेसाठी काँग्रेसच्या पाऊलावर असे टाकले पाऊल, निवडणुकीची अशी ठरवली रणनीती
तू चाल पुढं रं गड्या तुला भीती कशाची? पर्वा बी कुणाची?
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 10:07 AM

लोकसभेच्या हाराकिरीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसला. महायुतीतील इतर घटक पक्षांनी आब राखली. पण अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. आता विधानसभेसाठी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सोमवारी बजट सत्रादरम्यान दादांच्या गटाने एक बैठक घेतली. त्यात निवडणुकीवर चर्चा झाली. त्यानंतर दादांच्या गोटाने विधानसभा निवडणुकीसाठी नरेश अरोरा यांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत अरोरा

नरेश आरोरा हे पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सह संस्थापक आहेत. त्यांनी यापूर्वी राजस्थान आणि कर्नाटकसह अनेक राज्यात काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. सोमवारी अजित पवार गटाने घेतलेल्या बैठकीत नरेश आरोरा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पार्टीची ब्रँडिंग आणि रणनीतीविषयी सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी चर्चा केली.

हे सुद्धा वाचा

योजनांचे करा ब्रँडिंग, जनतेत मिळवा लोकप्रियता

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्यात योजनांचा पाऊस पाडला. त्यातील काही योजना राज्यात लोकप्रिय झाल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने या योजनांची ब्रँडिंग करण्याचे आणि जनतेत जाण्यासाठी एक 90 दिवसांची योजना आखली आहे.

दादांचे करणार ब्रँडिंग

अजित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून ब्रँडिंग करण्याचे आणि मेकओव्हर वर काम करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यांची प्रशासनावरील पकड, शब्दांचे पक्के दादा, सर्व आश्वासनांची पूर्तता करणारे, दिलेला शब्द पाळणारे नेते, रोखठोक अजित पवार या दृष्टीने त्यांचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे. विरोधकांच्या कोणत्याही खोट्या अफवांना बळी न पडण्याचे आणि त्यांच्या जाळ्यात न अडकण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. या उलट योजना, सरकारचे काम तळागाळात पोहचविण्यावर भर देण्यासाठी खास रणनीती आखण्यात आली आहे. या बैठकीला पक्ष प्रमुख अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि इतर ज्येष्ठ नेते हजर होते.

अजित पवार गटाला 41 आमदारांचे बळ

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दोन गट मिळून 53 जागा आहेत. जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांना दे धक्का देत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत, एनडीएत प्रवेश केला होता. अजित पवार गटाच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे 41आमदारांचे बळ आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे 8 मंत्रीपदं आहेत. शरद पवार गटाकडे 12 आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने 8 खासदार निवडून आणले तर अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.