Sanjay Raut | ईडी म्हणजे भाजपची शाखा, संजय राऊत यांचा घणाघात

| Updated on: Jan 24, 2024 | 11:00 AM

Sanjay Raut | ईडी ही केंद्रीय यंत्रणा राहिली नाही तर ती भाजपची शाखा झाल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी घातला. आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी संवाद साधत होते. महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी रोहित पवार यांच्या पाठिशी असल्याचे ते म्हणाले.

Sanjay Raut | ईडी म्हणजे भाजपची शाखा, संजय राऊत यांचा घणाघात
Follow us on

मुंबई | 24 January 2024 : ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र तपास यंत्रणा राहिली नाही, तर भाजपची शाखा झाल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी घातला. एकीकडे प्रभू श्रीरामाची पुजा करायची आणि दुसरीकडे आवाज दाबायचा असा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार हे ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी निघाले आहेत. ईडी आज त्यांची बारामती एग्रोसंदर्भात चौकशी करणार आहे. महाविकास आघाडी ही रोहित पवार यांच्या पाठिशी असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमची लोकशाहीची लढाई आहे ती कायम सुरु राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यंत्रणांकडून त्रास

जे लोक भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत. त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जातोय. मी स्वतः त्रासातून गेलो आहे आणि अजूनही कुटुंब जातंय, असे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या मागे राष्ट्रवादी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगाल मध्ये ईडीने कारवाई केली. आसामचे मुख्यमंत्री हे सर्वात भ्रष्ट आहेत तर ते भाजप सोबत आहेत, सध्याच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांना शांत झोप लागत असेल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता शांत झोप लागत असेल, कारण ते भाजपसोबत गेले, असा चिमटाही त्यांनी काढला. सध्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ईडीच्या भयाने पक्षातर केलं, असा टोला त्यांनी लगावला. अनेकजण ईडी ग्रस्त आहेत. मुलुंडचा नागडा पोपट अनेकवेळा आरोप करत होता ते लोक भाजप सोबत आहेत. आम्ही आठ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढला. अनेक ठिकाणी खात्यातील घोटाळे आम्ही काढले पण ईडी तिथं नोटीस पाठवत नाही. ईडी सूरज चव्हाण यांना अटक करते. ईडी संजय राऊत यांना अटक करते यावरून तुम्हाला वाटत नाही का ईडी भाजपची शाखा असा रोकडा सवाल त्यांनी केला.

भाजप मुक्ततेसाठी महाराष्ट्राचा पुढाकार

देशाला भाजप मुक्त करायचे असेल तर महाराष्ट्राने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. लोकसभेत निवडणुकीत 2024 ची सत्ता ताब्यात घेतली पाहिजे यासाठी काल उद्धव साहेबांनी घोषणा केलीय, असे ते म्हणाले. शरद पवार साहेब चालले आहेत एक पाठबळ असतं आमची लोकशाहीची लढाई आहे ती कायम सुरु राहील, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.