Ajit Pawar : जेवढं शक्य होतं तितके पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, जीएसटीवरून राज्य सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपाला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर

पेट्रोल-डिझेलच नाही, तर सीएनजीदेखील (CNG) आम्ही साडे तेरा टक्क्यांनी कमी केला. तो आता तीन टक्क्यांवर आणला आहे. साडे तीन हजार कोटी रुपयांचा राज्य सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण नागरिकांच्या सुविधेसाठी आपण सोसला आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : जेवढं शक्य होतं तितके पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, जीएसटीवरून राज्य सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपाला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर
जीएसटी रकमेविषयी माहिती देताना अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 12:40 PM

मुंबई : जीएसटीची (GST) ही रक्कम आत्ताची नाही. त्या रकमेचा इतर बाबींशी संबंध कसा काय लावता, असा सवाल करत राज्यानेही जेवढे शक्य होते तितके पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या आलेल्या रकमेविषयीची सविस्तर आकडेवारीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली. केंद्र सरकारने जीएसटीचे पैसे दिले, आता पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, असे भाजपाने म्हटले होते. त्यावर विचारले असता अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की पेट्रोल-डिझेलच नाही, तर सीएनजीदेखील (CNG) आम्ही साडे तेरा टक्क्यांनी कमी केला. तो आता तीन टक्क्यांवर आणला आहे. साडे तीन हजार कोटी रुपयांचा राज्य सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण नागरिकांच्या सुविधेसाठी आपण सोसला आहे, असेही ते म्हणाले. यात एक हजार कोटी गॅसचे दर दोन रुपया आणि एक रुपया 45 पैसे पेट्रोल डिझेल याचा समावेश आहे.

’15 हजार 502 कोटी येणे अजून बाकी’

जीएसटीची आकडेवारी सादर करताना अजित पवार म्हणाले, की मार्च 2022पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही 29 हजार 647 कोटी रुपये होती. त्यापैकी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या राज्यांची 21 राज्यांची 86 हजार 912 कोटी रक्कम रिलीज केली. राज्याचे 14 हजार 145 कोटी आपल्याला मिळाले. अजून येणे असणारी रक्कम 15 हजार 502 कोटी रुपये आहे. जेव्हा जीएसटी आला त्यावेळी असे सांगण्यात आले होते, की मार्च 2022पर्यंत कमी पडणारी रक्कम राज्यांना दिली जाईल. त्यानुसार 15 हजार 502 कोटी आपल्याला येणे बाकी आहे. ती रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा केला जाईल. त्याचा विकासकामांसाठी वापर करता येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले अजित पवार?

भाजपाकडून केली जात आहे टीका

जीएसटी परताव्याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे बोटे दाखवून जनतेची दिशाभूल करत ठाकरे सरकार आपल्या आर्थिक नियोजनातील ढिसाळपणाचे प्रदर्शन घडवू लागले आहे. जीएसटीचा मे महिन्यापर्यंतचा संपूर्ण परतावा केंद्राकडून मिळालेला असल्याने आता आकड्यांचा फसवा खेळ न करता पेट्रोल आणि डिझेवलरील राज्याचे कर 50 टक्क्यांनी कमी करून जनतेला दिलेले वचन पूर्ण करा, असे भाजपाने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.