काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांचीच खुर्ची मोठी का? रॅलीत नेमकं काय घडलं; अजित पवार यांनी दिलं कारण

सभेला सर्वच असतील असं नाही. प्रत्येक पक्षाचे दोन नेते उपस्थित राहतील असं ठरलं होतं. त्यानुसार दोनच नेते बोलले. काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांच्यासोबत सुरतला जायचं होतं. त्यामुळे ते दौऱ्यावर निघून गेले, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांचीच खुर्ची मोठी का? रॅलीत नेमकं काय घडलं; अजित पवार यांनी दिलं कारण
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 2:14 PM

मुंबई : महाविकास आघाडीची काल संभाजीनगरात मोठी सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या सभेत चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीची. या सभेत उद्धव ठाकरे यांची सर्वात उंच खुर्ची होती. महाविकास आघाडीतील नेत्यांपेक्षाही ही खुर्ची मोठी होती. अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेले आहेत. बाळासाहेब थोरात तर सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. माजी मंत्री आहेत. तरीही या नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांना बसायला मोठी आणि वेगळी खुर्ची दिल्याने चांगलीच चर्चा रंगली. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. स्टेजवर भेदभाव करण्यात आल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. सभेत प्रत्येक पक्षातून दोन दोन नेते बोलणार होते. त्यानुसार ते बोलले. माझी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती आहे की कृपया काहीही गैरसमज निर्माण करू नये. आमची वज्रमूठ आम्ही आणखी घट्ट करत आहोत, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

डिग्रीचं काय घेऊन बसलाय?

वेळ आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊ असं भाजपवाले म्हणत आहेत. वेळ आल्यावर म्हणजे काय? तुम्ही मुहूर्त पाहत आहात काय? हे निव्वळ राजकारण सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदींना 2014मध्ये डिग्री पाहून निवडून दिले आहे काय? डिग्री काय आहे? मोदींचा करिष्मापासून त्यांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आता डिग्रीचा विषय कशाला काढायचा? त्यांच्या डिग्रीचा प्रश्न महत्त्वाचा नाहीये. तर बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तरुणांना रोजगार नाहीये. इतिहासाच्या अभ्यासक्रमातून काही विषय वगळण्यात आले आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला.

बोंडेंना म्हणावं तुमचं सरकार आहे

यावेळी त्यांनी राज्यसरकारच्या कारभारावरही टीका केली. जनतेच्या पैशातून यांची जाहिरात चालू आहे. आम्ही कधीही जाहिरात केली नाही. आपलं काम चांगलं असेल तर जाहिरात करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. दंगलीत राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला होता. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. राजकारण किती खालच्या स्तराला गेलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळे तपास करा. हे कुणी तरी बोंडे यांना सांगा. दंगलीप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, असं ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.