कोरोना असेपर्यंत मास्क सर्वांनी वापरायचा, मास्कमुक्तीची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करु : अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आण पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आण पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली. मुंबईतील धोबी घाट, नरीमन भाट जेट्टी वरळी कोळीवाडा, दादर चौपाटी दर्शन गॅलरीची आणि माहीम रेती बंदराची पाहणी केली. मुंबईतील विविध भागांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील विकासकामांचा आढावा, कोरोना संसर्ग, मास्कमुक्ती, युती आघाडी, अर्थसंकल्प आणि इतर मुद्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ बैठक झाली की मास्कमुक्ती (Mask) बाबत चर्चा झाल्याच्या बातम्या सुरु होतात. मात्र, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत मास्क काढून चालणार नाही. मास्क हा लावावा लागणारचं, असं अजित पवार म्हणाले. मास्कमुक्तीची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करणार असून तेव्हा बातम्या चालवा, असं अजित पवार यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंनी कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही
आज सकाळी महालक्ष्मी रेसकोर्स सायकल ट्रॅक, धोबीघाट, सातरस्ता संत गाडगे महाराज चौक नुतनीकरण, पोलीस कॅम्प ते वरळी सी फेस पादचारी पुलाचे नुतनीकरण, वरळी नरीमनभाट जेट्टीचे सुशोभीकरण, दादर चैत्यभूमी व्हिंविग डेक, माहीम रेतीबंदर बीच सुशोभीकरण करण्यात आलं. विकास करताना काही जणांना शिफ्ट करण्यात आले. मात्र, आदित्य ठाकरे यांनी हे करत असताना कोणाला ही वाऱ्यावर सोडले नाही, असं म्हटलं.
पाहा व्हिडीओ
लगेच अंदाज बांधू नका
महाविकास आघाडी एकत्र काम करत आहेत. युतीबाबत तुम्ही जे विचारत आहेत ते वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील. गाडी चालवणं हे प्रत्येकाचं पॅशन असत आणि आम्ही सगळे एकत्र काम करतो. त्यांनी गाडी चालवली म्हणून वेगळा अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले. दर शुक्रवारी मी पुण्यात असतो, पण आज राष्ट्रपती मुंबईत असल्यानं सकाळी 7 ते 9 व्यवस्थित पाहणी केली. तुम्हाला न समजल्यानं व्यवस्थित पाहणी करता, आली असं अजित पवार म्हणाले. फोटो काढून आम्हाला नौटंकी करायची नाही, असं अजित पवार म्हणाले.
महामंडळ वाटपासंदर्भात महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कुठलिही अडचण नाही. सगळयांचं व्यवस्थित ठरलं, असल्याचं अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्रदयनाथ मंगेशकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात विचारलं असता लता मंगेशकर गेल्यावर आपण हा विषय काढतोय. देशात आणखीन समस्या आहेत की नाही ? याने बेरोजगारी कमी होणार का ? अर्थसंकल्पाबाबत चर्चा करु असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :
किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण, त्यांनी प्रोटेक्ट करायला हवं होतं : जयंत पाटील
अजित पवार आदित्य ठाकरेंचा एकाच गाडीतून प्रवास, आदित्य ठाकरेंकडून सारथ्य