मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मंत्रालयात हजेरी लावत कामकाजाला सुरुवात केली आहे. कोरोनानंतर अजित पवार पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेसबूक लाईव्ह करत ही माहिती दिली आहे. अजित पवार कोरोनामुक्त झाले होते त्यावेळी देखील सुप्रिया सुळे यांनी व्हॉटस अॅप स्टेटस ठेवत सर्वांचे आभार मानले होते. (Ajit Pawar Starts work after cured from corona )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त 2 नोव्हेंबरला कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 7 दिवस आराम केल्यानंतर अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे.
अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.
सात दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांना घरी सोडण्यात आले. यानंतरचे 7 दिवस विलगीकरणात राहिले. या कालावधीत अजित पवार यांनी कार्यालयीन कामकाज घरुनच केले. महत्वाच्या बैठकांनादेखील अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित राहिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील कोरोनामुक्त झाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्सेस आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानले आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलो आहे,अशा भावना दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केल्या.
आपणा सर्वांचे आशीर्वाद, प्रार्थना व माझ्यावर उपचार करणारे कोरोनायोद्ध्ये डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफ यांच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे.
धन्यवाद! ?? pic.twitter.com/QhNdIahm1x— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) November 10, 2020
दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांची कोरोना चाचणी 29 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते.
संबंधित बातम्या :
Ajit Pawar Corona : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह
(Ajit Pawar Starts work after cured from corona )