अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय!; भाजपने अप्रत्यक्षपणे दिली ऑफर, खरचं मुख्यमंत्री होणार?

१४५ आमदारांच्या बहुमताचा आकडा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी लागतो. तो आकडा त्यांच्याकडे असेल, तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री बनावं.

अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय!; भाजपने अप्रत्यक्षपणे दिली ऑफर, खरचं मुख्यमंत्री होणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 10:24 PM

मुंबई : अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर २०२४ मध्ये बघू, असं संजय राऊत म्हणाले. दादांमध्ये क्षमता आहे. आतापर्यंत अनेक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. पण काही जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून. तोडफोड करून, असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री झालो पाहिजे, असे वाटत असेल तर त्यात गैर काय. १४५ आमदारांच्या बहुमताची आकडा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी लागतो. तो आकडा त्यांच्याकडे असेल, तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री बनावं.

चार वेळा उपमुख्यमंत्री झाले

अजित पवार हे दबंग नेते आहेत. आतापर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्री झाले. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची हुलकावणी मिळाली. २००४ मध्ये काँग्रेसच्या ६९ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७१ जागा निवडून आल्या. त्यावेळी छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजय सिंह मोहिते पाटील आणि अजित पवार शर्यतीत होते. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेता ३ कॅबिनेटची अधिकची मंत्रीपदं आणि महामंडळ घेतली. त्या मोबदल्यात काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले.

हे सुद्धा वाचा

दानवे म्हणाले, बहुमताच्या बाजूने आले तर…

अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवरून भुवया उंचावण्याचं काम केलं. बहुमताच्या बाजूने अजित पवार आले तर मुख्यमंत्री होऊ शकतात. नाहीतरी दहा-वीस वर्षे वाट पाहावी लागेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले. दावा करणे आणि बहुमत असणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण, बहुमताच्या बाजूने ते आले तर मुख्यमंत्री होऊ शकतात, असं दानवे यांनी म्हंटलं.

चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात का राहिले?

गेल्या दोन आठवड्यांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार की काय अशा चर्चा सुरू होत्या. त्या तत्थ्यहिन चर्चा म्हणत अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. आता मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून नव्या चर्चेला हवा दिली. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून काम केल्याचं अजित पवार म्हणाले. त्यावरून नाना पटोले चांगलेच संतापले. मग पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात का राहिले, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.

सध्यातरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढतील, असे दिसते. पण, सत्ता आली तर मुख्यमंत्री पदावर दावा आपल्याच असेल, हे अजित पवार यांनी दाखवून दिलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.