लेकीच्या लग्नात अंबनींकडून 723 कोटी खर्च, देशातील सर्वात महागडं लग्न?
मुंबई : अभिनेते दीपिका-रणवीर, प्रियांका-निकनंतर आज मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा ही आनंद पीरामलसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आता अंबानी यांच्या मुलीचं लग्न म्हटंल तर ते ग्रॅण्ड असणे अपेक्षित आहेच. पण हे लग्न इकते ग्रॅण्ड असेल याचा तुम्ही-आम्ही कधी विचारही केला नसणार. हे लग्न देशातील सर्वात महागडं लग्न ठरणार आहे. कारण मुकेश अंबानी हे आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात 100-200 कोटी […]
मुंबई : अभिनेते दीपिका-रणवीर, प्रियांका-निकनंतर आज मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा ही आनंद पीरामलसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आता अंबानी यांच्या मुलीचं लग्न म्हटंल तर ते ग्रॅण्ड असणे अपेक्षित आहेच. पण हे लग्न इकते ग्रॅण्ड असेल याचा तुम्ही-आम्ही कधी विचारही केला नसणार. हे लग्न देशातील सर्वात महागडं लग्न ठरणार आहे. कारण मुकेश अंबानी हे आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात 100-200 कोटी नाही, तर तब्बल 723 कोटी रुपये खर्च करत आहेत. इंडिया टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या लग्नात 600 पाहुणे येणार असल्याची माहिती आहे. यात दोन्ही कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी असतील. या लग्नाला बॉलीवूडमधील मोठमोठे कलाकार उपस्थिती लावणार आहेत. लग्नासाठी अंबानींचं 27 मजली निवासस्थान ‘अँटिलिया’ सज्ज झालं आहे. अँटिलियामध्ये रोशनाई करण्यात आली आहे. ईशा आणि आनंदचे लग्न आज अँटिलियामध्ये होणार आहे.
लग्नाच्या आधी मुकेश अंबानीं यांनी उदयपूरमध्ये एक प्री वेडिंग सोहळा ठेवला होता. 7 डिसेंबरला झालेल्या या सोहळ्यात 5 हजार 100 लोकांसाठी चार दिवसांची विशेष अन्न सेवा सुरु केली होती. या लोकांना 10 डिसेंबरपर्यंत रोज तीनवेळचं जेवण देण्यात आलं.
8-9 डिसेंबरला लग्नापूर्वीचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात अमेरिकेची माजी प्रथम महिला हिलेरी क्लिंटन, प्रसिद्ध रॉक सिंगर बियॉन्स यांची विशेष उपस्थिती होती. तर बॉलीवूडचेही अनेक बडे कलाकार ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमात थिरकताना दिसले होते.
ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करत आहेत.