इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक डेडलाईन आधीच पूर्ण होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
जवळपास ५० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झालं. लेक्चर हॉल, ऑडिटोरियम वाहनतळ तयार झाला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इंदू मिलमधील स्मारकाची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी प्रेझेंटेशन बघीतलं. मॉडल बघीतलं. वेगानं ही काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक डेडलाईन आधीच पूर्ण होणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाबासाहेबांचं भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भेट देऊन पाहणी केली. कामाचा आढावा घेतला आहे. जगातील भव्यदिव्य स्मारक व्हावं ही आमची इच्छा आहे. साडेचारशे फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा साकारला जाणार आहे.
बाकी कामं प्रगतीपथावर आहे. त्याचा बेस तयार आहे. हे स्मारक व्हावं याची चर्चा झाली. सर्वसमावेशक समिती ही गाझियाबादमधला पुतळा पाहिला. त्याला अंतिम मंजुरी दिल्यावर तातडीने कार्यवाही होईल. कुठे काही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
जवळपास ५० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झालं. लेक्चर हॉल, ऑडिटोरियम वाहनतळ तयार झाला आहे. ७० टक्के हरीत पट्टा असणार आहे. मार्च २०२४ ची तारीख आहे. पण त्यापूर्वी स्मारक व्हावे हा प्रयत्न आहे. बाबासाहेब सर्वांचे होते. सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहोत, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी इंदी मिलला भेट दिल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती मुख्यमंत्री देणार असं सांगितलं. गाझियाबाद येथील पुतळा पाहिला जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरी मिळेल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. परंतु, ५० टक्के काम झालं आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. दिलेल्या निर्धारित वेळेपूर्वी काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.