Amit Shah : उद्धवजी, मी सांगतो तुम्ही कुणाच्या बाजूला बसलाय… अमित शाह यांनी वाचली यादी; तो मुद्दा जिव्हारी झोंबणारा?
Amit Shah Attack on Uddhav Thackeray : भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाश आज झाले. यावेळी अमित शाह यांना त्यांचे जुने सहकारी आठवले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वर्मी घाव केला. त्यांनी यावेळी महाविकास आघाडी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले. काय म्हणाले अमित शाह?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. यावेळी अमित शाह यांनी त्यांचे जुने सहकारी उद्धव ठाकरे यांची आठवण काढली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वर्मी घाव केला. त्यांनी यावेळी महाविकास आघाडी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले. काय म्हणाले अमित शाह?
तुम्ही कुठं बसलात ते सांगतो
यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला हाणला. “मी उद्धव ठाकरेंना काही सांगतो. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा. तो तुमचा प्रश्न. पण तुम्ही कुठे बसला आहेत ते सांगतो. तुम्ही ३७० कलमाला विरोध करण्याऱ्यांसोबत बसला आहात. तुम्ही रामजन्मभूमीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. सावकरकरांसाठी अपशब्द वापरणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात.” अशी एकामागून एक आरोपांची सरबत्ती करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले.
शरद पवार यांच्यावर निशाणा
यावेळी अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर पण निशाणा साधला. शरद पवार दहा वर्ष तुम्ही केंद्रात मंत्री होतात. २००४ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं ते सांगा. तुमच्या सरकारमध्ये दहा वर्षात महाराष्ट्रावर किती अन्याय झाला ते सांगा, असा प्रश्न त्यांनी विचारला.
शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात, अशी टीका शाह यांनी केली. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसवर जोरदार टीका
या देशात ३७० कलम संपेल कुणाला वाटत नव्हतं, ट्रिपल तलाक संपेल कोणीच मानत नव्हत, सीएए येईल कुणालाही वाटलं नव्हतं. राम मंदिर उभारलं जाईल हे कुणालाही वाटलं नव्हतं. पण आम्ही करून दाखवलं. दलित आदिवासी आणि ओबीसींचं आरक्षण घेऊन मुस्लिमांना द्यायला महाराष्ट्र तयार आहे का. आपल्या संविधानात धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद नाही. काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वीच हे आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनाही वचन द्याल तर विचारपूर्वक करा, असं सांगावं लागतं. पण आमचं तसं नाही. कर्नाटक, हिमाचल असो अनेक ठिकाणी काँग्रेस आश्वासनापासून दूर गेली आहे. पण युतीच्या आश्वासनावर देशाचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.