4 वर्षात तब्बल 214 किलो वजन घटवलं, अमिता राजानी यांची कहाणी
मुंबई : आशिया खंडातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या अमिता राजानी यांचं चक्क 214 किलो वजन घटवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. बोजड शरिरामुळे अमिता यांना चालता नव्हे तर हलताही येत नव्हतं. मात्र 42 वर्षीय अमिता यांच्यात पाच वर्षात जबरदस्त बदल झाला आहे. 5 वर्षांपूर्वी 300 किलोच्या असलेल्या अमिता यांचं वजन 86 किलोंवर आलं […]
मुंबई : आशिया खंडातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या अमिता राजानी यांचं चक्क 214 किलो वजन घटवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. बोजड शरिरामुळे अमिता यांना चालता नव्हे तर हलताही येत नव्हतं. मात्र 42 वर्षीय अमिता यांच्यात पाच वर्षात जबरदस्त बदल झाला आहे. 5 वर्षांपूर्वी 300 किलोच्या असलेल्या अमिता यांचं वजन 86 किलोंवर आलं आहे. त्या शेअर बाजारात कार्यरत आहेत.
अमिता यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करुन त्यांचं वजन कमी करण्यात आलं. त्यामुळे अमिता आता सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत.
लठ्ठ शरिरामुळे अमिता 8 वर्ष सतत बेडवर होत्या. त्यांना उठण्यास त्रास होत होता. आई-वडील अमिताच्या उपचारासाठी लंडनपर्यंत गेले, पण त्यांना यश आले नाही. अखेर मुंबईतील डॉक्टर शशांक शाह यांनी ही शस्त्रक्रीया करुन, अवघड काम करुन दाखवलं.
अमिता यांचं वजन कमी होण्यामागे बेरीएक्ट्रिक सर्जरीचा फार मोठा वाटा आहे. डॉक्टरांना या शस्त्रक्रियेसाठी विशेष ऑपरेशन बेड आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्सदेखील तयार करावे लागले, असं डॉक्टर शाह यांनी सांगितलं.
विशेष अॅम्ब्युलन्सने सोफ्यावरुन रुग्णालयात
चार वर्षांपूर्वी अमितांना विशेष अॅम्ब्युलन्सने सोफ्यावर बसवून रुग्णालयात आणलं होतं. अॅम्ब्युलन्समधून ऑपरेशन थिएटरपर्यंत नेण्यासाठी जवळपास 20 लोकांची मदत लागली होती. वजन कमी करण्यासाठी अमितांवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वजन वाढल्यामुळे अमिता यांची शारीरिक क्रिया जवळपास बंद पडत आल्या होत्या. मधुमेह, किडनी, तणाव यासारख्या समस्यांनी त्यांना ग्रासलं होतं.
आणखी 10-12 किलो वजन घटणार
दरम्यान, अमिता यांचं वजन 300 वरुन थेट 86 किलो आलं आहे. येत्या वर्षभरात त्यामध्ये आणखी 10-12 किलोची घट होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.
VIDEO: