स्मरणशक्तीची गोळी कुणाला पाठवणार?, डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं हे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे. अजित पवार की सुप्रिया सुळे. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी शरद पवार असं नाव सांगितलं.

स्मरणशक्तीची गोळी कुणाला पाठवणार?, डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं हे उत्तर
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 6:56 PM

मुंबई : झी मराठीच्या एका कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अमोल कोल्हे यांनी विविध प्रश्नांची खुमासेदार उत्तरं दिली. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथडा २८ व्या वर्षी बाहेर काढला होतो. मी शिवाजी महाराज यांची भूमिका केली तेव्हा २८ वर्षांचा होतो. संधी मिळाली म्हणून काम केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे. अजित पवार की सुप्रिया सुळे. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी शरद पवार असं नाव सांगितलं.

शरद पवार यांनी लागू केलं महिलांचं आरक्षण

शरद पवार यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवार यांनी महिलांचे आरक्षण लागू केलं. त्यावेळी त्या कोणत्या जातीची महिला आहे, याचा विचार केला नाही. शरद पवार यांनी पुण्यातील हिंजवडी येथे आयटी पार्क सुरू केलं. त्यांनी हे सर्व सुरू केलं. त्यामुळे शरद पवार यांनी काय केलं, असं कसं म्हणता येईल, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

स्मरणशक्तीची गोळी नरेंद्र मोदी यांना

औषधाच्या काही गोळ्या आहेत. त्या कुणाला पाठवालं, असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. डोकेदुखीची गोळी कुणाला पाठवाल, या प्रश्नाला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना असं उत्तर दिलं. स्मरणशक्तीची गोळी कुणाला पाठवाल, या प्रश्नाचं उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं उत्तर दिलं. कारण दरवर्षी दोन कोटी रोजगार येणार होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार होतं. ती गोळी त्यांना पाठवणार असल्याचं कोल्हे म्हणाले.

नैराश्य कमी व्हावं, अशी गोळी होती. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी लोकशाहीला फोन केला. यावेळी बोलताना म्हणाले, तू असण्यात १४० कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे. प्रश्न मनात होते म्हणून फोन केला. प्रश्न विचारण्याची मुभा नाहीय. कारण प्रश्न विचारले की ट्रोल धाड येते. देशद्रोह्याचा शिक्का मारून जाते आमच्या मस्तकावर.

कुठल्या तोंडाने म्हणायचे जय जवान जय किसान?

सीयाचीनला मायनस डिग्री सेल्सीअसमध्ये देशाचं रक्षण मुलगा करत असतो. त्याचा ७५ वर्षांचा बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीत कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असतो. आंदोलकांना निष्ठूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली चिरडले जाते. तेव्हा कुठल्या तोंडाने म्हणायचं जय जवान जय किसान, असा प्रश्नही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

वहिनींचा तुमच्यावर डॉक्टर म्हणून जास्त विश्वास आहे की, राजकारणी म्हणून. खरं तर दोन्ही नाही. मेडिकलचा टच सुटला आहे. बाहेर तुम्ही कितीची चांगले वक्ता असलात. जगातला कुठलाही वक्ता असला, तरी घरात तो श्रोता असतो, असं मिस्कील उत्तरं त्यांनी दिलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.