Amol Mitkari : आम्हाला झालेली धक्काबुक्की म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचा प्रकार, अमोल मिटकरींचा आरोप

| Updated on: Aug 24, 2022 | 12:44 PM

विधानभवनात आम्ही सकाळी एकत्र आलो, मात्र त्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी करून दादागिरी करण्याची भाषा केली. अधिवेशनाचे राहिलेले दोन दिवस अरेरावीत घालवायचे, हेच त्यांचे नियोजन होते, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

Amol Mitkari : आम्हाला झालेली धक्काबुक्की म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचा प्रकार, अमोल मिटकरींचा आरोप
अमोल मिटकरी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : विधानभवनातील (Assembly) पायऱ्यांवर आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की हा सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचा प्रकार आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमदार यांच्यात घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीही झाली. आमदार अमोल मिटकरी आणि आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्यातही यावेळी बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. यानंतर टीव्ही 9ने अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आमच्यासारख्या नवीन आमदारांवर अशाप्रकारची दादागिरी योग्य नसल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीची बैठक नुकतीच घेण्यात आली. यात शेतकरी विषयी मुद्दे मांडण्याकरिता एकत्र येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आम्ही साडे दहावाजता एकत्र आलो होतो, असे मिटकरी यांनी सांगितले.

‘विरोधकांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार’

विधानभवनात आम्ही सकाळी एकत्र आलो, मात्र त्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी करून दादागिरी करण्याची भाषा केली. अधिवेशनाचे राहिलेले दोन दिवस अरेरावीत घालवायचे, हेच त्यांचे नियोजन होते. जशासतसे उत्तर देण्याची त्यांची भाषा होती. भरत गोगावले यांनाही आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही आमदारांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही शांततेने उत्तर दिले. आंदोलन करण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार असेल, मात्र विरोधकांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. 50 खोके एकदम ओक्के ही आमची घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली, असे मिटकरी यावेळी म्हणाले.

‘महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा विषय नाही’

आमच्या घोषणेवर ते चिडले आणि त्यांनी धक्काबुक्की केली, असा आरोप मिटकरी यांनी केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा हा विषय नाही. आम्ही गरीब मायबापाच्या पोटी जन्माला आलो, तुम्ही मोठ्या घरात जन्माला आला असाल, असा हल्लाबोल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले अमोल मिटकरी?

‘अजितदादांनी मध्यस्थी केली’

महेश शिंदे हे कोण आमदार आहेत, मी त्यांना ओळखतही नाही. पत्रकारांच्या समोर आम्हाला त्यांच्यामार्फत धक्काबुक्की होत होती. मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आक्रमक झाले. आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. यावेळी अजितदादांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला, असे मिटकरी म्हणाले.