ब्राह्मण समाज सावलीसारखा माझ्या सोबत; कोणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण

दोन पिढ्यांपासून या समाजातील माझे असंख्य सहकारी सावलीसारखे आपल्या सोबत आहेत, आणि ब्राह्मण समाजातील लोक पाठीशी उभे राहिले त्या पाठबळावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत असंही त्यांनी सांगितले.

ब्राह्मण समाज सावलीसारखा माझ्या सोबत; कोणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
ब्राह्मण समाजाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाहीः धनंजय मुंडेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 8:36 PM

बीडः आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘कन्यादान विधी’, वैदिक मंत्र समाज याविषयी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे, मात्र जात-पात-धर्म याबाबतीत भेद करणे आमच्या अंगालाही शिवणार नाही, परंतु माध्यमांमधून अमोल मिटकरींनी केलेल्या व्यक्तिगत मतावरुन प्रतिक्रिया देताना आम्ही पाठीमागे हसतोय म्हणून दोष दिला जातो हे चुकीचे असल्याचे मत मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी व्यक्त केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी पक्ष (Political Party) आणि भूमिका याबद्दल सांगताना अमोल मिटकरींच्या वाक्याचा विपर्यास केला गेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेली त्यांनी सांगितले की, ही आमच्या पक्षाची भूमिका नाही किंवा पक्षाची भूमिका म्हणून मिटकरी बोलत नव्हते तर एका लग्नसमारंभातील प्रसंग त्यांनी आपल्या भाषणात सांगितला आहे. तरीही यातूनही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

…त्याचप्रमाणे ब्राह्मण समाज

दोन पिढ्यांपासून या समाजातील माझे असंख्य सहकारी सावलीसारखे आपल्या सोबत आहेत, आणि ब्राह्मण समाजातील लोक पाठीशी उभे राहिले त्या पाठबळावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत असंही त्यांनी सांगितले. याची परिपूर्ण जाणीव आपल्याला आहे. माझ्या राजकीय वाटचालीत आमच्या परळीचे ब्राह्मण समाजातील प्रथम नगराध्यक्ष म्हणून माझे सहकारी बाजीराव धर्माधिकारी यांना संधी दिली. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखविण्याचा यत्किंचितही हेतू आपल्या मनात येऊ शकत नाही. अमोल मिटकरी यांना आपण बोललो असून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याने योग्यवेळी त्याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करतील असेही धनंजय मुंडे यांनी या विषयावर बोलताना सांगितले.

यापूर्वी असे काही घडलेले नाही

अमोल मिटकरी यांनी व्यक्तीगत भाष्य केलेले आहे. याविषयी स्पष्टिकरण देण्याची गरज असल्याचे आपण त्यांना सांगितले आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखविण्याचा विचार आपल्या मनात कधी येत नाही, यापूर्वी असे काही घडलेले नाही. तरीही याबाबतीत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो. परंतु सर्वांना सोबत घेत जातीपाती विरहीत वाटचाल सुरू आहे सुरु राहील असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीवाद वाढला नाही हे जयंत पाटलांनी का सांगितलं नाही; शरद पोक्षेंचा सवाल

केवळ घोषणांचा पाऊस व शेतकऱ्यांची फसवणूक; ठाकरे सरकारवर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

Ankush Shinde : पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.