नेपाळच्या दुर्घटनाग्रस्त विमानात ठाण्याच्या वैभवी बांदेकर, घटस्फोटीत पतीसोबत करत होत्या प्रवास, मुलांच्या भेटीऐवजी नशिबी काळाचा घाला
विमान अपघात झाला तेव्हा ते आपल्या मुलांना भेटण्यासाठी नेपाळमधील मुक्तिधाम येथे जात होते. तेव्हा हा काळाने त्यांच्यावर हा घाला घातला गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

मुंबईः नेपाळच्या पोखरा ते मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोम येथे चार भारतीयांसह 19 प्रवाशांना घेऊन जाणारे तारा एअरचे विमान (Tara Air flight crashed) रविवारी लेटेहिल भागाजवळ कोसळले होते. त्या अपघाताचे सविस्तर तपशील आता समोर येत आहेत. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, अशोक त्रिपाठी (Ashok Tripathi) आणि वैभवी बांदेकर (Vaibhavi Bandekar) या चार भारतीय पीडितांपैकी दोघे होते मात्र ही दोघंही घटस्फोटीत होती आणि ती विभक्त झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या मुलांना 10 दिवस त्रिपाठीसोबत घालवावे लागणार होते.
विमान अपघात झाला तेव्हा ते आपल्या मुलांना भेटण्यासाठी नेपाळमधील मुक्तिधाम येथे जात होते. तेव्हा हा काळाने त्यांच्यावर हा घाला घातला गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.
मुंबईत करत होत्या नोकरी
वैभवी बांदेकर या मुंबईतील वांद्रे येथील कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका खासगी कंपनीत काम करत होत्या, तर त्यांचे पती ओडिशामध्ये राहत होते. ठाण्यातील माजिवडा येथील अथेना अपार्टमेंटमध्ये जाण्यापूर्वी ती बोरिवलीतही राहिल्या होत्या.
मुक्तिधामच्या दौऱ्याबद्दल खूप उत्सुक
यावेळी कैलाश व्हिजन ट्रेकच्या सुमन दहल यांनी त्यांच्याबद्दल सांगितले की, या कुटुंबाने त्यांची सहल दिल्लीतील एका कंपनीमार्फत बुक केली होती. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. त्यांची 27 मे रोजी मी भेट घेतली तेव्हा या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी ही कुटुंबीय मुक्तिधामच्या दौऱ्याबद्दल खूप उत्सुक होते. त्यांनी काठमांडू ते पोखरा असा प्रवास केला आणि पोखरा ते जोमसोम या विमानाने प्रवास केला होता.
खराब हवामानामुळे टेक ऑफ उशीर
तर टूर मॅनेजर सागर आचार्य यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की मी 27 मे रोजी काठमांडूला ही दोघंही आल्यावर त्यांची मी भेट घेतली होती. त्यावेळीही ती प्रचंड आनंदी दिसून आली. त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले. नंतर त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात जाऊन आरतीही केली. त्यानंतर 28 मे रोजी ते काठमांडू ते पोखरा मार्गे रस्त्याने गेले. तर आम्ही विमानाने गेलो. तर रविवारी त्यांचे विमान पोखरा येथून पहाटे 6 वाजता निघणार होते आणि खराब हवामानामुळे त्यांचे टेकऑफ उशीर झाला.
तारा एअरच्या विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला
सकाळी 9.45 च्या सुमारास, समिट एअरवेजच्या दोन विमानांनी उड्डाण केले, त्यानंतर तारा एअरचे उड्डाण 9.55 वाजता होते. टेक ऑफ करण्यापूर्वी अशोक त्रिपाठी यांनी मला फोन केला होता की सर्वकाही ठीक आहे. समिटची ती दोन उड्डाणे सुरक्षितपणे उतरली आणि मग तारा एअरच्या विमानाचा एटीसीशी संपर्क तुटल्याची बातमी आम्ही ऐकली. मला काही हेलिकॉप्टर कंपन्यांची माहिती असल्याने आम्ही अपघातस्थळी हेलिकॉप्टर पाठवून दिले. त्यानंतर कंपनीतर्फे त्यांच्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली.