Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | बुकीच्या मुलीसोबत 6 वर्षे मैत्री कशी, अमृतांनाच घेराव

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच पत्नीला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाला आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. आरोपी अनिक्षा जयसिंघानीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर बुकीच्या मुलीसोबत 6 वर्षे मैत्री कशी असा सवाल अमृता फडणवीसांना करण्यात आलाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | बुकीच्या मुलीसोबत 6 वर्षे मैत्री कशी, अमृतांनाच घेराव
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 11:41 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच पत्नीला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाला आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. आरोपी अनिक्षा जयसिंघानीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर बुकीच्या मुलीसोबत 6 वर्षे मैत्री कशी, असा सवाल करत अमृता फडणवीसांना विरोधकांनी घेरलंय. बघा tv9चा स्पेशल रिपोर्ट.

अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाची 21मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झालीय. तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात, धक्कादायक अशी माहिती दिलीय. अनिक्षाने अमृता फडणवीसांशी मैत्री करुन वडील अनिल जयसिंहानीला सोडवण्यासाठी मदत मागितली. त्याबदल्यात 1 कोटी देण्याची तयारी अनिक्षानं दाखवली मात्र अमृता फडणवीसांनी हे ऐकून अनिक्षाचा फोन कट करुन ब्लॉक केला.

त्यानंतर अनिक्षानं काही व्हिडीओ दुसऱ्या नंबरवरुन अमृतांना पाठवले. वडिलांवरील केसेस मागे घ्या आणि त्यानंतरच व्हिडीओ डिलिट करणार अशी धमकी अनिक्षानं दिली. त्यासाठी 10 कोटींची खंडणी सुद्धा अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे मागितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलंय.

अनिक्षाला पोलीस कोठडी मिळालीय..त्यामुळं पोलिस अधिक तपास करुन प्रकरणाच्या मूळापर्यंत जातील…पण यावरुन राजकारण तापलंय. डोळ्यासमोर ब्लॅकमेलिंग सुरु असताना नाकानं कांदे सोलू नका, अशी टीका संजय राऊतांनी फडणवीसांवर केलीय. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि प्रियंका चतुर्वेदींनी अमृता फडणवीसांना ट्विटवरुन घेरलंय. 6 वर्षांपासून फरार बुकीच्या मुली सोबत मैत्री तरीही, अमृता फडणवीसांना कसं माहिती पडलं नाही ?, असा सवाल अंधारेंनी केलाय.

हमारी इतनी औकात कहां है अमृताजी, की हमारे एक अर्जी पर लोग हमारी पुलिस कम्प्लेंट तुरंत ले ले. और FIR भी दाखिल कर दे और जो मर्जी चाहे हम वह चार्जशीट बना दे. ननंद भाभी के नाते इतना लिखने की तो औकात बनती ही है ना भाभी? हमारी इतनी औकात कहां की क्रिकेट बुकी की बेटी है यह जानते हुए भी लगभग 5 साल तक उससे दोस्ती बनाए रखी. और अगर बात बिगड़ती नजर आए तो फिर उसी को फंसाये व्हिडीओ पाठवून कशाप्रकारे ब्लॅकमेलिंग करण्यात आलं, हे फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं…तर व्हिडीओ सार्वजनिक करा, अशी मागणी अंधारेंनी केलीय..

प्रियंका चतुर्वेदींनीही स्वतंत्र चौकशीची मागणी केली. त्यानंतर चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस ट्विटरवरच भिडल्या. प्रियंका चतुर्वेदींचं ट्विट काय होतं ते आधी बघा. डिझायनर मैत्रिणीनं उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला बुकी व्यवसायाबाबत सांगितलं, मात्र तरीही त्यांची मैत्री कायम राहिली. पण पोलीस कुणाला रिपोर्टिंग करतात?, तर गृहमंत्र्यांना. गृहमंत्री कोण आहेत?, तर देवेंद्र फडणवीस. तक्रार कुणी केली आहे?, तर अमृता फडणवीसांनी. आता या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला नको का?

मॅडम चतुर, तुम्ही याआधीही माझ्यावर अॅक्सिस बँकेतून फायदा करुन घेतल्याचा आरोप केला होता. आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेताय का?. कुणी तुमचा विश्वास संपादन करुन, केसेस बंद करण्यासाठी संपर्क साधला असता आणि त्याबदल्यात पैशाचं आमिष दाखवलं असतं. तर तुम्ही तुमच्या मालकामार्फत त्याला मदत केली असती. हीच तुमची औकात आहे

प्रकरण लाचेचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग पर्यंत मर्यादित नाहीय. तर बुकी अनिल जयसिंघानीशी या प्रकरणाचे तार जुळलेत…वडील अनिल जयसिंघानीलाच सोडवण्याचा खटाटोप अनिक्षाचा होता. अनिल जयसिंघांनी उल्हासनगरमधला क्रिकेट बुकी आहे. 2010मध्ये छोटा बुकी म्हणून ओळख पण फसवणुकीचाही आरोप आहे. 2010 मध्ये बेट घेताना फाईव्ह स्टार हॉटेलमधून रंगेहात अटक झाली होती

डीसीपी अमर जाधव आणि एसीपी महेश खेतळे यांच्या टीमनं जयसिंघानीला अटक केली होती अटक करणारे पोलीस अधिकारी अमर जाधव आणि महेश खेतळेंविरोधात जयसिंघानीनं काही वर्षानंतर किडनॅपिंगची तक्रार दिली. त्यानंतर डीसीपी अमर जाधव यांनी पोलीस खात्यातून राजीनामा दिला. जयसिंघानी एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या जवळचा म्हणून ओळखला जायचा. जवळचा आयपीएस अधिकारी मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर जयसिंघानीची सीपी ऑफिसमध्ये ये-जा असायची अनिल जयसिंघानीला ‘त्या’ पोलीस आयुक्तांनी एक बॉडीगार्डही दिल्याची माहिती आहे.

स्वत: देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात, राजकीय अँगल आहे की काय ? अशी शंका व्यक्त केलीय..अनिक्षा 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असेल. त्यामुळं नवी माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांचा असेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.